सोलापूर – अणदुर ते फुलवाडी (ता. तुळजापर) मार्गावरील शेरी पुलाजवळ खाजगी आराम बसच्या धडकेने दुचाकी चालक गंभीर जखमी होऊन मरण पावला. हा अपघात आज सोमवारी (ता. 18) पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. Tuljapur: A two-wheeler driver was killed in a collision with a private bus on Andoor Road
किशोर बाबुराव गाळाकाटे (वय ४५ रा. अणदूर ता.तुळजापूर) असे मयताचे नाव आहे. ते आपल्या दुचाकीवरून फुलवाडी येथे निघाले होते. शेरीपुला जवळ खाजगी बसच्या धडकेने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपसारापूर्वीच मयत झाले. या अपघाताची प्राथमिक नोंद सिव्हील चौकी पोलिसात झाली आहे.
□ मंगळवेढा येथे कोयत्याने मारहाण एक जखमी
मंगळवेढा येथील सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे पैसे मागितल्याच्या कारणावरून कोयत्याने केलेल्या मारहाणीत ज्ञानोबा रावसाहेब सोनवणे (वय २२) हा जखमी झाला. ही घटना काल रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बबन काळे आणि झुंबऱ्या शेरसिंग या दोघांनी मारहाण केली अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/584479933229740/
□ कुंभारी येथे जुगार अड्ड्यावर छापा: रोख रकमेसह ५० हजाराचा माल जप्त
सोलापूर – कुंभारी (ता.दक्षिण सोलापूर) येथील एका पत्राशेड मध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर वळसंगच्या पोलिसांनी छापा टाकून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम मोबाईल आणि दुचाकी असा ५० हजाराचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल रविवारी (ता.17) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
रतन रामा गोस्वामी (रा.सुनिल नगर), प्रकाश बाबुराव तडलगी (रा गुरुवार पेठ सोलापुर), आनंद सुरेश बंडे (रा.पाणीटाकीजवळ, सोलापूर), मल्लीनाथ गोविंद शाहापुरे ( रा. इंदीरा नगर, जुळे सोलापूर), कल्याणी सिध्दाराम गंगदे ( रा. होटगी, ता. द सोलापुर), वासुदेव दुर्गादास तडका (रा. जुना विडी घरकुल), सईद जब्बार बागवान ( रा.शुक्रवार पैठ, सोलापूर), श्रीनिवास मुच्चय्या कोटा ( रा. कुंभारी घरकुल), बाबु संकप्पा डेर
(रा.मौलाली चौक सोलापुर), अब्दुल रजाक शेख (रा.समाधान चौक सोलापुर), मल्लीनाथ
सिध्दाराम हरळे (रा. न्यु मल्लीकार्जुन नगर) आणि दिलीप शिवाजी बंदपट्टे ( रा. साईबाबा चौक, सोलापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या जुगा-यांची नावे आहेत.ते सर्वजण पत्त्याच्या डावावर पैसे लावून जुगार खेळत होते. पुढील तपास सहाय्यक फौजदार सोनकांबळे हे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/584485403229193/