Thursday, March 23, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पंढरपुरातील आश्रम शाळेत 43 मुलांना विषबाधा; कारवाई होणार, वाचा मुलांची नावे

43 children poisoned in ashram school in Pandharpur; Action will be taken against the culprits

Surajya Digital by Surajya Digital
July 18, 2022
in Hot News, सोलापूर
0
पंढरपुरातील आश्रम शाळेत 43 मुलांना विषबाधा;  कारवाई होणार, वाचा मुलांची नावे
0
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पंढरपूर – शेगांव दुमाला (ता.पंढरपूर) येथील विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या 43 मुलांना अन्नातून विषबाधा झाली असून, विषबाधा प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिले. 43 children poisoned in ashram school in Pandharpur; Action will be taken against the culprits

 

विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या 43 मुलांना काल रविवारी (दिनांक 17 जुलै) अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या मुलांची आज अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी भेट घेवून विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार सुशिल बेल्हेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम उपस्थित होते.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या मुलांनी शेजारील मोतीराम महाराज मठात पंगत असल्याने जेवायला गेले होते. जेवणानंतर 43 मुलांना उलट्या, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे संजीव जाधव यांनी सांगितले.

 

तसेच संबंधित ठिकाणच्या जेवणातील सर्व पदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घेण्यात आले असून, ते नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिल्याचे अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांनी सांगितले.

 

 

● उपचार घेत असलेल्यांची नावे :

सुदर्शन झगडे (औरंगाबाद ) प्रदीप शिरोळे (नाशिक) ओंकार निर्मळे (गोवर्धन) पवन सुलतानी (जालना) प्रणव शिंदे (पारने) दर्शन जाधव (सिंदखेड) गौरव जायभाग (सावखेड) विनायक नाडे (नाशिक) सिद्धेश्वर शिसूले (ढवळगाव) वैभव कुंभार (डोंगरकुढर) प्रफुल्ल नवले (कोपरगाव) सुदर्शन सुलतानी (जालना) अजिनाथ मालकर (पैठण) केशव पवार (दौंड) हरीओम वडेकर (मानवली) अभिजीत शिंदे (मुसळगाव) लक्ष्मण हुके (पळसगाव) ऋषिकेश कोल्हे (निमगाव) नितीन गव्हाड (फुलंब्री) ऋषिकेश तांबवे (वाळवा) सुदर्शन खवले (परभणी) अर्जुन गवार (हकेगाव) गणेश राहणे (वैजापूर) प्रताप गीते (तळोशी) ऋषिकेश चव्हाण (ढावगाव) अभिषेक मोटे (बीड) करण परदेशी, माऊली गोवासे (परभणी) आदिल दावरे (कोल्हापूर) वैभव शेटे (नाशिक) माऊली गव्हाड (काडेगाव) अमर साठे (जळगाव) सुखदेव वाघ (करमाळा) हर्षल काकडे (सिल्लोड) गजानन शिंदे (अचलगाव) अनिरुद्ध वैद्य, तुळशीराम गिरी (गेवराई) गणेश देशमुख (गंगापूर) राम जाधव (वाशिम) कृष्णा शिंदे (संभाजीनगर) प्रेम इंगळे (जळगाव) श्रीधर तांबिले, तेजस साठे.
Tags: #children #poisoned #ashram #school #Pandharpur #Action #culprits #solapur#पंढरपूर #आश्रम #शाळा #मुलांना #विषबाधा #दोषी #कारवाई #सोलापूर
Previous Post

अमळनेरकडे जाणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 ठार

Next Post

ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंकडून जुनी कार्यकारिणी बरखास्त, नव्या नेत्यांची निवड

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंकडून जुनी कार्यकारिणी बरखास्त, नव्या नेत्यांची निवड

ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंकडून जुनी कार्यकारिणी बरखास्त, नव्या नेत्यांची निवड

वार्ता संग्रह

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697