मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त केली आहे व नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पण यात शिवसेना पक्षप्रमुख पदाला हात लावण्यात आलेला नाही. शिंदे गटाकडून ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू होती. त्यावेळी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. Shock to Uddhav Thackeray, Eknath Shinde dismisses old executive, elects new leaders
बंडखोरांच्या गटातील अनेक आमदार, नेत्यांना नव्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. जुनी कार्यकारिणी बरखास्त करताना शिंदेंनी पक्षप्रमुख मात्र बदलला नाही. त्यामुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे मूळ शिवसेना आमचीच असा दावा करत असलेल्या शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख पदावरून हटवले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत असून यामुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून शिंदे यांची निवड करण्यात आली. तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी व नेतेपदी रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली आहे. यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा व शिवाजीराव आढळराव पाटील यांना उपनेते करण्यात आले आहे.
शिंदे गटाच्या बैठकीसाठी शिवसेनेचे १४ खासदार उपस्थित होते. त्यामुळे ५५ पैकी ४० आमदार शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे आता खासदारही शिंदे गटात जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान शिंदे यांनी सेनेचे जुनी कार्यकारिणी बरखास्त केल्यामुळे शिवसेनेसाठी पुढील मार्ग खूप खडतर राहणार असल्याचे म्हटले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी आधीच शिंदेंनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त केली आहे. त्यानुसार त्यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/584485403229193/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिंदे गटाने जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये रामदास कदम, आनंदराव आडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, यशवंत जाधव, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा यांची उपनेते पदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनाही शिंदे गटात स्थान देण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरील फूटही उद्या होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढील राजकीय घडामोडी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची बैठक आज हॉटेल ट्रायडेंट येथे पार पडली. या बैठकीत आमदारांसह अनेक खासदारही दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले की, सगळेच खासदार आमच्या संपर्कात आहे, असं मला वाटतं. त्यामुळे आमदारांसह आता खासदारही शिवसेनेला सोडून शिंदे गटात सामील होणार का, हे आता पहावे लागणार आहे.
□ रामदास कदमांचा राजीनामा, लगेच हकालपट्टीचे पत्रक जाहीर
मागील काही दिवसांपासून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षातील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. त्यातच, आज उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे लागलीच कदमांची पक्षातूनच हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रक शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले.
मात्र, मूळ शिवसेना आमचीच आहे, असं दाखवत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये अनेकांना जुन्या कार्यकारिणीप्रमाणेच नियुक्ती दिली आहे. मात्र, पक्षप्रमुख पदासाठी कोणाची नियुक्ती केलेली नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/584479933229740/