मुंबई : शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या डोळ्यात आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू आले आहेत. ‘मी 52 वर्ष शिवसेनेत काढले, तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच तुम्हाला माझ्या ह्रदयातून काढले आहे, म्हणून मी राजीनामा दिला आहे’, असे कदम उध्दव ठाकरेंना उद्देशून म्हणाले. मला पक्ष एकत्र आणायचा आहे. आज बाळासाहेब असते तर ही वेळ आली नसती, हे बोलताना ते भावूक झाले होते. Ramdas Kadam cried profusely, removed Uddhavji from his mind, accused Sharad Pawar of breaking the party
आज त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळेस ते स्वताला आवरू शकले नाहीत. ते माध्यमासमोर ढसाढसा रडले.
माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर आपल्याला कोणतीही कोणतीही किंमत राहिली नाही. माझा मुलगा व मला वेळोवेळी अपमानित करण्यात आल आहे. मीडिया समोर कधीच जाऊ नका अस सांगण्यात आलं. असे आरोप रामदास कदम यांनी पत्रातून केला आहे.
□ शरद पवारांनी पक्ष फोडला
52 वर्षे काम करणाऱ्या एका शिवसैनिकावरती राजीनामा देण्याची वेळ का येते याचे आपण आत्मपरिक्षण केले पाहिजे असेही रामदास कदम म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.शिवसेना फोडण्याचा शरद पवारांचा घाट होता. शरद पवारांनी उध्दव ठाकरेंना फसवले. खासदार, आमदार, नगरसेवक सगळे शिंदे गटात जाताहेत. ते म्हणाले की, शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडलं. पक्षाच्या कारवाईनंतर मी खूप अस्वस्थ असून, राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एखाद्या पक्षासाठी 52 वर्षे लढणारा नेत्यावर राजीनामा देण्याची वेळ येते याचा विचार करायला हवा असेही ते म्हणाले.
पक्ष संपला तरी चालेल. पण शरद पवारांची साथ सोडायची नाही. बाळासाहेबांच्या आत्म्याला दुःख झाले. तरी चालेल. पण उध्दवजींनी दोन पावलं मागे यायला हवे. उध्दवजींच्या आसपास जे लोक आहेत. ते त्यांना जाऊ देणार नाहीत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/585062283171505/
□ आत्मचिंतन करण्याचा सल्ला
शिवाजीराव अढळराव पाटील, आनंद अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत त्यांचीदेखील हकालपट्टी करणार आहात असा प्रश्नदेखील कदम यांनी याावेळी उपस्थित केला. तसेच मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का? असा खोचक टोलादेखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला. हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचं आत्मचिंतन करा असा सल्लादेखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
□ आदित्य कोणत्या भाषेत बोलतोय ?
राणे, राज ठाकरे, छगन भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा मी संघर्ष केला आणि ते आज माझी हकालपट्टी करतात. असं म्हणत रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आमदारावरील टीकेवर बोट ठेवले. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांवर आदित्या ठाकरेंनी किती प्रकारची टीका केली, असे म्हणत त्या आदित्यचं वय काय आणि तो कोणत्या भाषेत आमदारांना बोलतोय? याचं जरा भान ठेवावे असे रामदास कदम म्हणाले.
आदित्य ठाकरे आमदार गोवाहाटीला गेले होते. त्यांना काय बोलले. त्यांचे हे बोलण्याचे वय नाही. मी ज्या वेळेला महाविकास आघाडीचे सरकार बनत होते, त्यावेळी सांगितले की, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा करु नका. हे सांगून बाहेर पडल्यानंतर मी पावणे तीन वर्षे ’मातोश्री’ वर गेलो नाही. मला बोलावून सांगितले. मीडिया समोर बोलू नका. तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी खात हातो.
□ उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याचे आवाहन
यावेळी त्यांनी विनायक राऊतांवर निशाणा साधला. बेईमानी आमच्या रक्तात नाही. एकनाथ शिंदेनी पक्ष वाचवलाय. उध्दवजी कुठूतरी बसून निर्णय घ्या. असे आव्हान रामदास कदम यांनी उध्दव ठाकरेंना केले. माझा मुलगा योगेश सहा महिने वेळ मागत होता. पण तुम्ही वेळ दिला नाही. आता तुमच्याकडे वेळ आहे. आम्ही सगळी भावंड, पत्नी आम्ही सगळ्यांनी विचार केला. आमदार जी भूमिका घेत आहेत. ती योग्य आहे त्यानंतर आम्ही शिंदे गटात गेलो. पक्ष मनामध्ये आहेत.
यावेळी शिवसेनेसाठी आम्ही जिवाचे रान केले. ते त्यांनी आवेशाने सांगितले. आमच्या बद्दल आणखी कोणी काही बोलले तर भूकंप होईल. शिवसेनेमध्ये शेकडो लोकांचे बळी गेले, अनेक शिवसैनिक जेलमध्ये गेले, अनेक शिवसैनिकांचे रक्त सांडले. 1977 सालामध्ये झालेल्या आंदोलनात आम्हाला अटक झाली होती. काही दिवसांपूर्वीच बेळगावला जावून 10 लाखांचा जामीन घेतला. आशा प्रकारे तिव्र शब्दात रामदास कदम यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/585068906504176/