□ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने असा साजरा केला अजित पवारांचा वाढदिवस
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस हटक्या पद्धतीने साजरा केला. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीला थेट नवीन आठ हजाराची साडी भेट म्हणून पाठविण्यात आली. The Nationalist Mahila Aghadi sent a new saree worth eight thousand to the wife of rebel MLA Shahajibapu patil
यावेळी शहराध्यक्ष सुनिता रोटे, नलिनी चंदेले, लता फुटाणे, शशिकला कसपटे, नसिमा शेखसंदी, गौरा कोरे, लता ढेरे, सुनंदा साळुंखे, वंदना भिसे, ज्योती सातकर, मालन शेख, वाघमारे यांचा सहभाग होता.
दरम्यान साडी पाठवण्यामागील उद्देश सांगताना लोलगे म्हणाल्या, शिवसेनेतून बंड करून गुवाहाटीला गेलेल्या सांगोला आमदार शहाजी पाटील यांनी एका मुलाखतीत मी माझ्या पत्नीला साडी घेऊ शकलो नाही, एवढा मोठा आमदार आपल्या पत्नीला साडी घेऊन देत नाही याची खंत वाटते. त्यामुळेच राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने बापू यांच्या पत्नीला आम्ही महिला पदाधिकाऱ्यांनी पैसे जमवून चांगल्या दर्जाची सोलापुरी साडी घेऊन सांगोल्याला पाठवल्याचे प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587013389643061/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 99881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/586929552984778/
■ सोलापुरात रविवारी विद्यार्थ्यांची सायकल रॅली, सहभागी होण्याचे आवाहन
सोलापूर : वन विभाग सोलापूर यांच्या सहकार्याने वन संवर्धन दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग यांच्या प्रोत्साहनातून इको फ्रेंडली क्लब आणि जय अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची सायकल रॅली, नेचर वॉक आणि वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वन विभागाच्यावतीने देण्यात आली.
हे सर्व कार्यक्रम येत्या रविवारी (ता. २४ जुलै) रोजी होणार आहेत. यावेळी सकाळी ६.३० वाजता सायकल रॅलीला जय अकॅडमी येथून सुरुवात होणार आहे. ही रॅली व्हीआयपी रोड सात रस्ता, धर्मवीर संभाजी महाराज तलाव विजापूर रोड, इंचगिरी मठ मार्गे श्री सिद्धेश्वर वन विहार येथे आल्यानंतर या रॅलीचा समारोप होणार आहे.
यानंतर सकाळी ९ वाजता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी पर्यावरण संवर्धनात माझा सहभाग, माझ्या स्वप्नातील सोलापूर पर्यावरणपूरक सण उत्सव हे विषय असणार आहेत. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८७८८९९२०८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/586928862984847/