मुंबई : ठाकरे कुटुंबातील व्यक्ती आता शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. स्मिता ठाकरे या गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणापासून दूर आहेत. त्या पुन्हा सक्रीय होणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जाईल. Balasaheb Thackeray daughter-in-law Smita Thackeray in Shinde group? Met the Chief Minister
मुख्यमंत्र्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. राज ठाकरे आणि फडणवीस सरकारच्या बाजूनेच बोलत आहेत, असेही त्यांच्या पत्रकार परिषदांमधून दिसून आले आहे. अशातच, आता ठाकरे कुटुंबीयांपैकी आणखी एक जण शिंदे गटाला जाऊन मिळण्याची तयारी दाखवत असल्याचे कळत आहे.
उद्धव ठाकरे यांचे भाऊ जयदेव ठाकरे यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी स्मिता ठाकरे या एकनाथ शिंदेंना भेटायला गेल्या आहेत. मात्र, या भेटीचं कारण अजून गुलदस्त्यात आहे. यावेळी स्मिता ठाकरे यांच्यासोबत वेलनेस अंबेसिडर रेखा चौधरी आणि नंदुरबार माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांची भेट घेणाऱ्या स्मिता ठाकरे या ठाकरे कुटुंबातील पहिल्याच व्यक्ती आहेत. एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडली असताना स्मिता ठाकरे यांनी अचानक एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/589742366036830/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या भेटीबद्दल माध्यमांशी बोलताना स्मिता ठाकरे यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे हे जुने शिवसैनिक आहेत. ते मुख्यमंत्री झाले आहेत, म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतल्याचं स्मिता यांनी म्हटलं.
शिवसेनेतल्या फुटीमध्ये तुम्ही शिंदे गटाकडून आहात की ठाकरे गटाकडून या प्रश्नाचं उत्तर मात्र स्मिता यांनी दिलं नाही. ‘मी राजकारणात नाही. मी समाजसेवा करते, असं म्हणून त्या निघून गेल्या. मी राजकारणात नाहीये, असं म्हणणाऱ्या स्मिता ठाकरेंकडे थेट बाळासाहेबांच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिलं गेलं होते.
‘मी त्यांना खूप वर्षांपासून ओळखते. माझ्यासाठी आज ते ज्या खुर्चीवर बसले आहेत त्याचा आदर मी करते. त्यांचे कामही मला माहीत आहे. त्यांनी शिवसेनेत किती कार्य केलेले आहे ते मला माहीत आहे. मी त्यांना आदराने बघते. एकनाथ शिंदे हे आमच्यासाठी जुने कार्यकर्ते आहेत. मी कुटुंबवगैरे पाहिले नाही, तर मी एक व्यक्ती म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले.’
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. पालापाचोळ्यानेच आता इतिहास घडवला असून जनतेला सत्य परिस्थिती माहित आहे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. शिवसेनेतून पालापाचोळा बाहेर पडल्याने आता शिवसेना स्वच्छ झाली आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/589667606044306/