सोलापूर – ओळखीत असलेल्या गतिमंद तरुणीला आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची निंदनीय घटना अक्कलकोट रोड परिसरात सोमवारी (ता. 25) दुपारच्या सुमारास घडली. यात एकास अटक करून त्याची पोलीस कोठडीत रवानगी केलीय. Accused of raping a young girl arrested; Sunawali Police Custody Solapur MIDC
या प्रकरणात एमआयडीसीच्या पोलिसांनी अजिज उर्फ अहमद गुलामदस्तगीर शेख (वय ४५ रा. साईनगर) याला अटक केली. त्याला ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याच्या आदेश न्यायालयाने आज मंगळवारी दिला.
ती गतिमंद तरुणी अक्कलकोट रोड परिसरात राहण्यास असून मूक बधिर शाळेत शिक्षण घेते. तिच्या वडिलांच्या परिचयातील अजीज उर्फ अहमद शेख हा त्यांच्या घरी येत होता. आणि त्या गतिमंद मुलीला कधी कधी तिच्या घराजवळील दुकानातून खाऊ घेऊन देत होता.
सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अजिज उर्फ अहमद हा त्या मुलीच्या घरी आला. त्यावेळी मुलीची आजी घरात होती. थोडा वेळ बसल्यानंतर त्याने मुलीला सोबत घेऊन खाऊ आणतो असे सांगितले. आजीने नकार दिला असतानाही त्याने पाच मिनिटात आणतो, असे म्हणून तिला घेऊन गेला त्यानंतर दीड तासाने मुलीला घराजवळ सोडून बाहेरून निघून गेला. तेव्हा पिडीत मुलीने रडत रडत इशाऱ्याने घडला प्रकार आजीस सांगतिली. रात्री कामावरून घरी परतलेल्या पिडीतेच्या वडिलांना घडला प्रकार समजल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी अजिज उर्फ अहमद शेख याला अटक करून पोलीस कोठडी घेतली. सहाय्यक निरीक्षक कुकडे पुढील तपास करीत आहेत.
□ कुर्डूवाडी येथे सराफाचे दुकान फोडले, ७० हजाराचे दागिने लंपास
सोलापूर – कुर्डूवाडी येथील गांधी चौकात असलेल्या दर्शन ज्वेलर्स या दुकानाचे शटरच्या पट्ट्या कापून चोरट्याने कपाटातील एक किलो चांदीचे दागिने आणि डीव्हीआर मशीन असा ७० हजाराचा माल पळविला. ही चोरी सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. दुकानाचे मालक दर्शन सुरेंद्र देवी (रा. कुर्डूवाडी) यांनी यासंदर्भात कुर्डूवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली. हवालदार वाडगे पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/589742366036830/
□ हगलूर येथे चाकूने मारहाण, पती-पत्नी जखमी
हगलूर (ता.उत्तर सोलापूर) येथे दारूच्या नशेत घरात घुसून चाकू आणि लाथाबुक्याने केलेल्या मारहाणीत मनोहर गणेशकर (वय ३२) आणि त्यांची पत्नी कोमल गणेशकर (वय २८ रा.हगलूर) हे दोघे जखमी झाले.
ही घटना रविवारी (ता. 24) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात तालुक्याच्या पोलिसांनी मोहन उर्फ बब्बू सुभाष पोळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. मोहन पोळ दारू पिऊन रात्रीच्या सुमारास गणेशकर यांच्या घरात घुसून विनाकारण मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार मियावाले पुढील तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/589658409378559/