मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, असं ट्विट करत शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ‘शिवसेना पक्षप्रमुख’ उल्लेख टाळला. Eknath Shinde congratulated Thackeray by avoiding photos but…, Saman newspaper rejected the rebel ad
आज उद्धव यांचा वाढदिवस असल्याने शिंदे यांनी आज सकाळीच ट्विट केले आहे. शिंदे या ट्विटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
विशेष म्हणजे शिंदे यांनी उद्धव यांच्या नावापूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख असा केलेला नाही. तसेच फोटोही टाकणे टाळले आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी उद्धव यांचे नाव माजी मुख्यमंत्री असे घेतले आहे. त्यामुळे शिंदे हे उद्धव यांना शिवसेना पक्ष प्रमुखही मानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे.
तसेच, शिवसेना पक्ष प्रमुख होण्याचे शिंदे यांचे स्वप्न असल्याचेही यातून स्पष्ट होत आहे. कारण, शिंदे यांनी सेनेचे सर्वप्रथम ४० आमदार फोडले. त्यानंतर आता १२ खासदारही फोडले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
परिणामी, विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे गटनेते पद गेले आहे. शिवाय शिंदे यांनी थेट निवडणूक आयोगाकडेच धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हाची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या कृतीनंतर आता शुभेच्छांद्वारेही त्याचा प्रयत्न उघड होत असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर भरपूर रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर धनुष्यबाणाची प्रतिकृती फुलांनी साकारली आहे. याच धनुष्यबाणावरून सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात वाद आहे. मात्र आज मातोश्रीबाहेर पक्षाचं हेच चिन्ह अगदी ठळकपणे सजवण्यात आलं आहे.
बंडखोरांची जाहिरात सामना वृत्तपत्राने नाकारली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार आणि खासदारांनी ठाकरेंच्या वाढदिवसाची जाहिरात देण्यासाठी सामना वृत्तपत्राच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी त्यास नकार दिला. तसेच वरिष्ठ नेत्यांकडून तशा सूचना असल्याचंही सांगण्यात आलं. शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी ही माहिती दिली.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार आणि खासदारांनी या वर्षीदेखील अशी जाहिरात देण्यासाठी सामना वृत्तपत्राच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार अथवा खासदार तसेच शिवसैनिकाला जाहिरात प्रकाशित करता येणार नाही, असे सांगितले.
वरिष्ठ नेत्यांकडून तशा सूचना असल्याचंही सांगण्यात आलं. शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मला ज्या प्रमाणे सांगण्यात आले, तसाच नकार इतर खासदारांनाही देण्यात आला. उद्धव ठाकरेंबद्दल आजही आम्हाला आदर आहे. आम्ही त्यांना येथूनच शुभेच्छा देतो, असंही खासदार राहुल शेवाळे म्हणाले.
आज 27 जुलै रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही ‘सामना’ मध्ये जाहिरातीसाठी संपर्क साधला असतो कर्मचाऱ्यांनी स्वीकारल्या नाहीत. यामागे काय कारण आहे, हे विचारलं असता तेदेखील सांगितलं नसल्याचं सांगण्यात आलं, अशी माहिती खासदार राहुल शेवाळेंनी दिली.