Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Bogus Organic Fertilizer सोलापुरात रासायनिक खतात आढळली माती

Bogus Organic Fertilizer Soil Mohol Padsali found in chemical fertilizer in Solapur

Surajya Digital by Surajya Digital
July 30, 2022
in Hot News, शिवार, सोलापूर
0
Bogus Organic Fertilizer सोलापुरात रासायनिक खतात आढळली माती
0
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : सध्या शेतातील महत्वाची कामं सुरु आहेत. पिकांना खतघालनी सुरु आहे. मात्र  सोलापूरमध्ये काही शेतकऱ्यांच्या खतात माती मिश्रित खडे टाकून शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा काही खत कंपन्यांनी सुरू केला आहे. हा धक्कादायक प्रकार अकलूजमध्ये समोर आला आहे. खतांमध्ये चक्क मातीच्या खड्यांची भेसळ आढळून आली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. Bogus Organic Fertilizer Soil Mohol Padsali found in chemical fertilizer in Solapur

केवळ विद्राव्यच नव्हे, तर अनेक मिश्रखतासह आता अलीकडे बोगस सेंद्रिय खत विक्रेत्यांचा नुसता सुळसुळाट आहे. प्रशासनाचे मात्र हातावर हात असल्याचेच या टोळ्यांच्या बिनधास्तपणातून समोर येते. खत भेसळीतून केवळ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान असेच नाही, तर शेती-माती समोर मोठे संकटही उभे राहते. प्रशासनाच्या ढिम्मपणाबाबत जिल्ह्यांत संताप व्यक्त होत आहे.

 

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ, सावळेश्वर आणि पडसाळी येथे सापडलेल्या विद्राव्य खतातील मिठाचा प्रकार हा त्याचाच एक भाग आहे. मिठाची ५० किलोची गोणी केवळ १५० ते २५० रुपयांना मिळते. पण पुढे तीच गोणी संबंधित कंपनीच्या पॅकिंगमध्ये या टोळ्यांकडून खत म्हणून तब्बल ३५०० रुपयांना विकली जाते. अर्थात, एखाद्या शेतकऱ्याची तक्रार आलीच, तर वातावरणावर दोष देऊन मोकळे व्हायचे किंवा अन्य एखाद्या रासायनिक खताची मात्रा द्यायला लावून सुटका करून घ्यायची, असा प्रकार सुरू असतो. या सगळ्यात शेतकऱ्यांना मात्र त्यातला फरक लक्षातच येत नाही.

गोणीमागे हजार, दोन हजारांची बचत होते, म्हणून फारसा विचार करत नाहीत. ते अगदी सहजासहजी फसतात. काही ठिकाणी कारवाईत प्रशासनावर राजकीय दबाव येतो, तर अनेकदा प्रशासनाकडून अशा प्रकारावर कारवाई झाल्यास कायद्यातील त्रुटींमुळे अडसर येतो. अनेकवेळा भेसळ किंवा बोगसगिरी न्यायालयात सिद्ध होताना, कायद्याच्या पळवाटा शोधत, या टोळ्या मोकाट सुटतात.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

विद्राव्य खतासह अन्य मिश्रखतातही असेच प्रकार सर्रास होतात, १९ :१९ :१९ या प्रकारात बोगस खत बनवताना युरिया भरडून त्यात लाल किंवा पिवळा रंग मिश्रण करून पॅकिंग तयार केले जाते. ज्याचा खर्च १५० रुपयांपर्यंत आहे. तेच खत पुढे १५०० ते २००० रुपयांना विक्री होते. ० :० :५० या प्रकारात बोगस खत बनवताना पांढरा पोटॅश भरला जातो, ज्याची किंमत ५०० रुपये आहे, त्याच खताची किंमत पुढे २००० ते २५०० रुपयांपर्यंत होते. त्यात सेंद्रिय खतामध्ये तर अधिक वाव मिळतो, सॉईल कंडिशनर म्हणून अलीकडे निंबोळी खताचा वापर वाढतो आहे. सध्या निंबोळीच्या एकूण उपलब्धतेचा विचार करता, किती प्रमाणात या खतात निंबोळी आहे, हे सांगता येत नाही. अनेकवेळा त्यात थेट मातीच मिसळून विक्री केली जाते, असे प्रकार घडले आहेत.

कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाला दरमहा कृषी विक्रेत्यांची आलटून पालटून अथवा रॅण्डम पद्धतीने खताचे नमुने घेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात प्रयोगशाळेकडून ज्या विक्रेत्याकडील नमुन्याचा अहवाल फेल ठरला, त्या विक्रेत्याला विक्रीबंदचे आदेश दिले जातात. त्यानंतर पुढे दुसऱ्यास्तरावर गरज पडली, तरच तपासणी होते. या दोन्ही स्तरावर कारवाई न झाल्यास पुढे हा विषय न्यायालयात जातो. पण अनेकवेळा पहिल्याच स्तरावर ‘अर्थपूर्ण तडजोडी’ होतात. त्यामुळे गुणनियंत्रण विभागाचा कुठेच ‘गुण’ दिसत नाही आणि कोणत्याही प्रकारे ‘नियंत्रण’ही राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

 

मूळात सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी यात कारवाई करणे अपेक्षित होते, पण थेट पुण्याहून कशी झाली, यावर आक्षेप घेण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना ताब्यात घेताना, बोगस खताची पोती ताब्यात घेणे आवश्यक होते, पण ती घेण्यात आली नाहीत, तसेच संशयितांना पकडल्यानंतर संबंधित कृषी विक्रेत्याच्या दुकानाची झडती घेणे आवश्यक होते, पण ती टाळण्यात आली. पडसाळीतील गुन्हा उशिरा दाखल झाला, मोहोळ आणि पडसाळीतील दोन्ही गुन्हे एकाचवेळी दाखल झाले असते, तर बोगस खताचा साठा सापडला असता, या सगळ्या प्रक्रियेत बराच वेळ गेल्याने संशयितांना पुरावे नष्ट करण्यास संधी मिळाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

 

Tags: #Bogus #Organic #Fertilizer #Soil #Mohol #Padsali #found #chemical #fertilizer #Solapur#BogusOrganicFertilizer #सोलापूर #रासायनिक #खत #आढळली #माती #मोहोळ #पडसाळी
Previous Post

अगरबत्तीच्या धुरांमुळे आगेमोहळचा हल्ला; पंधरा जखमी तर पाच मुले अत्यवस्थ

Next Post

राज्यपालांनी माफी मागावी, कारवाई व्हावी, कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज – उद्धव ठाकरे

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
राज्यपालांनी माफी मागावी, कारवाई व्हावी, कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज – उद्धव ठाकरे

राज्यपालांनी माफी मागावी, कारवाई व्हावी, कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज - उद्धव ठाकरे

वार्ता संग्रह

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697