● रुग्णालयात उपचार सुरु
● पाच लहान मुले अत्यवस्थ
● शेतकरी तुकमाळी कुटुंबावर हल्ला
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे महालक्ष्मी पूजेसाठी गेलेल्या महिला पुरुषांसह लहान बालकांवर आगेमोहळ उठून मधमाश्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये तालुक्यातील सलगर येथील शेतकरी तुकमाळी कुटुंबातील १५ जण जखमी झाले. जखमींना ताबडतोब अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी पाच लहान बालकांची प्रकृती अत्यवस्थ आहे. Aggravation due to incense fumes; Fifteen injured and five children in critical condition Akkalkot Salgar
सलगर येथे सकाळी १० च्या सुमारास शेतातील महालक्ष्मी पूजेसाठी गेलेले भाविकांनी अगरबत्ती लावले असता अगरबत्तीच्या धुरांमुळे आगे मोहळ उठले. तेथील ग्रामस्थांवर मधुमाशांनी जोरदार हल्ला चढवला. यात ५ लहान बालकांचा तसेच ४ महिला आणि ६ पुरुषांचा यात समावेश आहे.
जखमींना उपचारासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी अत्यावस्थ लहान बालकांवर सोलापूर येथे उपचार चालू आहे. सलगर येथील माजी कृषी सहाय्यक हणमंत तुकमाळी यांचे परिवार हे काल शुक्रवारी (दि २९ जुलै ) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास श्रावणमास प्रारंभीच्या पहिला दिनानिमित्त लक्ष्मीच्या पुजनास गेले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592104699133930/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मंदिराजवळील चिंचेच्या झाडावरील आग्यामोहळने १५ जणांवर हल्ला चढविला. त्यातील जखमींना ग्रामीण रूग्णांलय अक्कलकोट येथे उपचारास दाखल केले. ही घटना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना समजताच त्यांनी रूग्णालयात जाऊन विचारपूस केले. संबंधीत डॉक्टर सतिश बिराजदार, डाॅ गायकवाड यांच्या सोबत चर्चा करत रुग्णांची स्थिती जाणून घेतली.
यावेळी सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्या शीतल म्हेत्रे, सिद्धार्थ गायकवाड, रामचंद्र समाणे, बसवराज अळ्ळोळी, सायबु गायकवाड, अरविंद म्हेत्रे, डाॅ. बसवराज नंदिकोले, महादेव चुंगी आदी उपस्थित होते. जखमी लोकांची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनकुमार करजखेडे भेट देऊन पाहणी केली. यावेळी डॉ गायकवाड, डॉ प्रियंका वाघज, डॉ शेख, डॉ माळी यांनी जखमींवर उपचार केले.
□ हल्ल्यात जखमी झालेल्याची नाव
शोभा सिद्धाराम गोगाव (वय ३० वर्षे), हनुमंत बंडप्पा तुकमाळी (वय ६ वर्षे), सुनिल रेवणसिद्ध म्हेत्रे (वय २४ वर्षे), सिद्धाराम लाडप्पा म्हेत्रे(वय १६ वर्षे) भीमाशंकर गुरप्पा तुकमाळी (वय १८ वर्षे), गंगाबाई हणमंत तुकमाळी (वय ५५ वर्षे ), महादेवी गुरुलिंग चिकमळ (वय ६०वर्षे), राजश्री गुरप्पा तुकमाळी (वय ४०वर्षे), शिवानंद गुरप्पा तुकमाळी (वय २० वर्षे), चंद्रकांत बंडप्पा तुकमाळी (वय ५० वर्षे) जखमी झाले आहेत.
जखमी मुले वेदिका सोमशेखर तुकमाळी (वय अडीच वर्षे), सनिधी सिद्धाराम गोगाव (वय ७ वर्षे), समृद्धी सिद्धाराम गोगाव (वय ९ वर्षे), शिवराज सिद्धाराम गोगाव (वय ५ वर्षे), समर्थ शिवानंद आंगडी (वय ७ वर्षे) या पाच मुलांना सोलापूरला पुढील उपचारासाठी पाठविले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592066535804413/