□ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह 8 जनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पंढरपूर न्यायाल्याचे आदेश
पंढरपूर :- महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी या भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवला होता. पंढरपूर तालुक्यातील सामाजिक वनीकरण परिक्षेत्र विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांसह 8 जणांविरुद्ध न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना दिले आहेत. In Pandharpur, 33 crore trees were planted in the corruption of crores by the Forestry Department
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बनावट दस्तवेज तयार करून बोगस कर्मचाऱ्यांच्या नावावर 1 कोटी 25 लाख रुपये परस्पर लाटले आहेत. सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या सन 2019-2020 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली होती. त्यानुसार पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने पंढरपूर समाजिक वनीकरण विभागामार्फत शहर व तालुक्यातील प्रमुख रस्ते, मैदाने शासकीय कार्यालय परिसरात दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592104699133930/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मात्र सदर योजना शासनाच्या नियमाप्रमाणे न राबविता तत्कालीन वनरक्षक संतोष नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर आहिरे, वनमजूर आंबान्ना जेऊरे यांनी संगणमत करून अनेक ठिकाणी अर्धवट झाडे लावली, व या योजनेवर मजुरीसाठी कधीही उपस्थित नसणारे प्रवीण जाधव, जयशिंग नागणे, आभाजीत गायकवाड, प्रताप गायकवाड, अनिल गायकवाड, राणी गायकवाड, मयूर गायकवाड, वनिता दनवले, स्वती दणवले, लक्ष्मण साळवी, आदी नागरिकांना बनावट मजूर दाखवून त्यांच्या नावे बनावट दस्त, खोटी कागतपत्रे तयार करून त्यांच्या व्हाऊचर वर सह्या न घेता व्हाऊचार नंबर 32, वर बोगस सही, आंगठे, करून 1 कोटी, 25 लाख रुपयांचा आपहार केला आहे.
सदर प्रकरणाची कून कून लागताच आर आर पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष समाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण ( पटवर्धन कुरोली ) यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरावे, माहिती देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे न्यायालयाचा आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर फिर्यादी दादासाहेब चव्हाण यांनी स्वतः पंढरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्याद घेतली नाही
म्हणून 1 जुलै 2021 रोजी पोस्टाने फिर्याद दिली. त्यानंतर ही अपहाराचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे 27 ऑगस्ट 2021 रोजी फिर्यादीने पंढरपूर न्यायालाय दाद मागितली होती. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम आर कामत यांनी या प्रकरणी वन विभगाच्या तीन कर्मचाऱ्यांसह 8 जनावर कलम 156 आंतर्गत गुन्हा दाखल करून कलम 120, 406, 420, 463, 464, 465, व पर्यावरण कलम कायदा 15 व 17 नुसार अहवाल करून अहवाल सदर करण्याचे आदेश पंढरपूर पोलिसांना दिले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591546995856367/