मुंबई : राजस्थानी, गुजराती मुंबईतून गेल्यास मुंबईत पैसा नसेल, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले. त्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यपालांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यपालांनी मराठी अस्मितेचा अपमान केला, समाजात फूट पाडण्याचे काम त्यांनी केले आहे, असे ठाकरे म्हणाले. Governor should apologise, action should be taken, need to show Kolhapuri Joda – Uddhav Thackeray’s controversial statement
राज्यपालांच्या या बेताल वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यपालांना आता घरी पाठवायचे की तुरुंगात असा प्रश्न उपस्थित करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी महाराष्ट्राची संस्कृती पाहिली असेल, पण त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याचीही गरज आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींवर टीका केलीय. गुजराती, राजस्थानी लोकं मुंबईतून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं कोश्यारी म्हणाले होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592310942446639/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्यपालांनी अंधेरी येथील एका कार्यक्रमामध्ये मुंबईमध्ये गुजराती आणि मारवाडी यांच्यामुळे पैसे आहेत, मुंबईला आर्थिक राजधानी अशी ओळख गुजराती आणि मारवाडी लोकांमुळे असल्याचे बोलले आहे. परिणामी, त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी शिंदे गटाकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यपाल हे राज्याचे उच्च पद आहे. पण या पदावर असलेली व्यक्ती महाराष्ट्रात राहूनच मराठी माणसाचा अपमान करत आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम राज्यपाल करत आहेत. राज्यपालांनी दोन ते तीन वर्षात महाराष्ट्रातील सुंदर लेण्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-किल्ले व महाराष्ट्रातील इतर सुंदर गोष्टी पाहिल्या असतील, पण आता त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर शब्दांचा हल्ला चढवला आहे. आता या कोल्हापुरी जोड्यांचा अर्थ ज्याला जसा काढायचा आहे तसा त्यांनी काढावा, पण आता खरंच राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल या पदाची आणि त्यांच्या खुर्चीची शान ठेवली नाही. महाराष्ट्रात राहून मराठीशी नमकहरामी करणे कितपत योग्य आहे ? पण यावेळी उद्धव ठाकरे राज्यपाल कोश्यारी यांचे आभार सुद्धा आभार मानले. कारण भगतसिंग कोश्यारी यांच्यामुळे दिल्लीकरांचा हेतू स्पष्ट झाला आहे. दिल्लीकरांचा जीव मुंबईतील पैशांमध्ये अडकला असल्याचे राज्यपालांच्या वक्तव्यातून जाणवून येत असल्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.
□ कालचे राज्यपालांचे वक्तव्य
राज्यापाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये भगतसिंग कोश्यारी यांच्यावर मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप आहे. काल शुक्रवारी (२९ जुलै) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत जे.पी. चौकाचे नामकरण आणि उद्घाटन समारंभ अंधेरी पश्चिम मुंबई रोडवरील दाऊद बाग जंक्शन येथे झाला. या चौकाला स्वर्गीय शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी भगतसिंग कोश्यारी बोलत होते.
भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “कधी कधी मी महाराष्ट्रातील जनतेला सांगतो की, जर तुम्ही गुजराती आणि राजस्थानींना मुंबई आणि ठाण्यातून हटवले तर तुमच्याकडे एकही पैसा उरणार नाही. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना वगळले तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही.
जेपी रोड, अंधेरी पश्चिम मुंबईचे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर, पंकज भोयर, कोरिओग्राफर रेमो डिसोझा आणि उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी या चौकाच्या नामकरण आणि उद्घाटन समारंभाला प्रामुख्याने उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592305685780498/