● ऑडिओक्लिप प्रकरणीही गुन्हा दाखल
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, ‘1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांनी केलेल्या लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. 10 वर्षांपासून 637 मराठी कुटुंबियांना बेघर करणाऱ्या संजय राऊतांना हिशोब द्यावाच लागणार आहे. संजय राऊत चौकशीला का जात नाही’. A case has also been registered in the audio clip case, 1034 crore has to be accounted for; ED team entered Sanjay Raut’s house
खासदार संजय राऊत यांच्या राहत्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. राऊत यांची गेल्या सहा महिन्यापासून 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी चौकशी सुरु आहे. राऊत यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर आर्थिक गैरव्यवहार केल्याची केस दाखल करण्यात आली होती. याआधीही राऊत यांची ईडीने अनेक वेळा चौकशी केली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून ते आता राज्यातील ठाकरे सराकार कोसळेपर्यंत प्रत्येक राजकीय लढाईत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची बाजू लावून धरणारे खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने धाड टाकली आहे. यापूर्वी संजय राऊत एकदा ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. परंतु, गेल्या आठवडाभरात ईडीने दोनवेळा चौकशीसाठी बोलावूनही संजय राऊत ईडीसमोर हजर झाले नव्हते. त्यामुळे आता ईडीचे अधिकारीच संजय राऊत यांच्या घरी गेले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592724092405324/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/592730879071312/
शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी राऊतांवरच्या कारवाईनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सावंत म्हणाले की, यापूर्वीही संजय राऊतांनी अनेकदा सांगितलंय की माझा संबंध नाही. ईडीने समन्स बजावल्यावरही सांगितलं की सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे, त्यानंतरची तारीख द्या. त्यामुळे सहकार्य केलं नाही वगैरे काही नाही. ही सूडबुद्धी आहे. त्यांनी अधिवेशनामुळे फक्त वेळ वाढवून मागितली होती.
अरविंद सावंत म्हणाले की, राज्याच्या राजकारणात सध्या जे चाललंय त्यावर राऊत सातत्याने आसूड ओढतात. त्यांच्याविषयीचा सूड कसा उगवायचा, म्हणून हे सगळं चाललंय. ते जेव्हा निवडणुकीला उभे राहिलेत, त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात सगळी संपत्ती दाखवली आहे. हे सगळं सूडबुद्धीने चाललंय. उद्धव ठाकरेंना हे दाखवून द्यायचंय की बघा तुमच्या जवळच्या माणसालाही आम्ही त्रास देऊ शकतो. शरण या नाहीतर ईडी आहेच.
□ ऑडिओक्लिप प्रकरणी गुन्हा दाखल
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची एक ऑडिओक्लिप सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या कथित ऑडिओक्लिपच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून केली आहे.
त्यानुसार संजय राऊत यांच्याविरोधात आयपीसी 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्पिल व्हायरल होत आहे. या ऑडिओक्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. या ऑडिओक्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592724552405278/