□ निर्भया पथकाची विशेष कामगिरी
अकलूज : पोलिसाच्या निर्भया पथकाने अकलूजमध्ये विशेष कामगिरी पार पाडली आहे. त्यांना काळ्या बाजारात जाणारा रेशनचा दोनशे पोती तांदूळ पकडण्यात यश आले आहे. यामुळे निर्भया पथकाचे कौतुक होत आहे. Akluj Nirbhaya team caught two hundred sacks of ration rice going to the black market
माळशिरस फुलेनगर येथे अकलूज येथील निर्भया पथकाचे पोलिस नाईक अनिल शिंदे हे 6.30 च्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना एका आयशर टेम्पो क्र . एम एच 12 पी . 2653 हा रस्त्याने जात असताना व त्याचा संशय आल्याने सदरचा टेम्पो अडवला. टेम्पोतील माल पहिला असता त्यामधे 50 किलो वजनाचे पांढऱ्या रंगाच्या 200 पोत्यामध्ये रेशनचा तांदूळ असल्याचे लक्षात आले.
वाहन चालक यशवंत भीमराव पिसे (रा . वाडी न .2 माळशिरस) याने सदरचा माल हा फुलेनगर येथील अशोक शंकर वाघमोडे यांच्या खाजगी गोडाऊन मधून घेऊन इंदापूर येथील सोनाई पशू खाद्य येथे घेऊन चाललो असल्याचे सांगितले. सदरचा तांदूळ हा रेशनचाच असल्याची खात्री झाल्याने , निर्भया पथकाचे पोलिस नाईक अनिल शिंदे यांनी तहसीलदार यांना ही माहिती कळविली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592724092405324/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
माहिती समजताच तहसीलदार यांनी पुरवठा निरीक्षक सुशांत केमकर व पुरवठा आवल कारकून चंद्रशेखर लोखंडे यांनी माळशिरस पोलिस ठाण्यात लावलेल्या आयशर टेम्पोतील मालाची पाहणी केली. पाहणी केली असता हा तांदूळ हा रेशन दुकानातील असल्याची खात्री झाली.
पुरवठा निरीक्षक सुशांत केमकर यांनी अशोक शंकर वाघमोडे व यशवंत भीमराव पिसे (दोघे रा.माळशिरस) याचे विरूद्व अत्यावश्यक वस्तू कायदा सं 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे फिर्याद दाखल केली. माळशिरस फुलेनगर येथील अशोक शंकर वाघमोडे याने खाजगी गोडाऊन तयार केले असून तो माळशिरस येथील काही रेशन चालकांना हाताशी धरून माल गोळा केला.
गोळा केलेला माल काळ्या बाजाराने विक्री करण्याचा अनेक वर्षापासून व्यवसाय सुरू आहे. यातूनच अशोक वाघमोडे याने फार मोठी मालमत्ता गोळा केली असून याकडे तहसीलदार यांनी चौकशी करून मालमत्तेची ही चौकशी करावी, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. या कामी पो कॉ सूर्यवंशी, घाडगे, चालक अमोल माने यांचीही साथ मिळाली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592826979061702/