मुंबई : सर्वोच्च न्यायालय शिंदे सरकारच्या बाबतीतला निर्णय आता 3 ऑगस्ट रोजी घेणार आहे. यापूर्वी न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख दिली होती. ही सुनावणी सरन्यायाधीश रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर होणार आहे. कोर्टात दोन्ही बाजूंनी शपथपत्र दाखल झाले आहे. हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा निर्णय आता तीन ऑगस्टला होणार आहे. Big update for Shinde-Thackeray from Supreme Court; Decision now on 3rd August Eknathbhau
एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेतील पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट या दोन्ही गटांनी परस्परांविरोधात दाखल केलेल्या विविध याचिकांवर उद्या सोमवारी ( ता. 1 ऑगस्ट) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतही सुनावणी आता बुधवारी (ता. 3 ऑगस्ट ) होणार असून सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याबद्दल बोलताना शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी, ‘न्यायालयात आमचाच विजय होणार’ असा आत्मविश्वास व्यक्त केला.
शिवसेनेच्या 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाविरोधात बंड पुकारले. त्यानंतर 12 खासदार देखील शिंदे गटात सामिल झाले. खासदारांनी बंड पुकारल्यानंतर या खासदारांनी मूळ शिवसेना पक्ष आमचाच असल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाने केला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला पक्षावरील हक्क सांगण्याबाबत नोटीस बजावली आहे. दोन्ही बाजूंना आठ ऑगस्टपर्यंत बाजू मांडण्यास सांगितली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592826979061702/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सरन्यायाधीश रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा फैसला आता तीन ऑगस्टला होणार आहे. कोर्टात दोन्ही बाजूंनी शपथपत्र दाखल झालं आहे. कुठल्या घटनात्मक बाबींवर सुनावणी हवी याबाबत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद या दिवशी कोर्ट निश्चित करणार आहे. सोबतच निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का हे देखील याच दिवशी समजणार आहे.
राज्यातील सत्तापेचावर शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर स्थगिती देण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर सुप्रीम कोर्ट सुनावणीला तयार झाले आहे. एक ऑगस्ट रोजी इतर याचिकांसोबत याही मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार होते. मात्र ही सुनावणी आता 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सुनावणीत सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेतील अंतर्गत वादावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी शिवसेनेने पावले उचलली आहेत. त्याला शिंदे गटाने आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टातील याचिकांवर निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे शिवसेनेने म्हटले आहे.
□ शिंदे सरकार कोसळू शकते ?
राज्यातील शिंदे सरकार तरणार की कोसळणार, याबाबत सत्ताधाऱ्यापासून ते विरोधकांपर्यंत मते व्यक्त होत आहेत. शिंदे गट आणि शिंदे सरकारशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्याने शिंदे सरकारवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावर एकनाथ खडसे प्रतिक्रिया देताना, यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये राज्यघटनेतील तरतुदीनुसार दिलेले निर्णय पाहता हे सरकार कोसळू शकते, असा दावा केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिंदे सरकार राहील की नाही राहणार याबाबत शंका आहे. हे सरकार कोसळू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सरकार बरखास्त होऊ शकते. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात १६ आमदारांच्या पात्रतेचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. त्या १६ आमदारांना एकतर गट स्थापन करून कोणत्यातरी पक्षात जावे लागेल, नाहीतर ते अपात्र ठरू शकतात, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/592771409067259/