मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. त्यातच आता संजय राऊत यांच्या घरातून 11.50 लाखांची कॅश सापडल्याचं समोर येत आहे. ED ने छापेमारीदरम्यान ही कॅश जप्त केली आहे. या प्रकरणात ईडी संजय राऊत यांना प्रश्न विचारणार असल्याचं समोर आलं आहे. ED action seized cash amount of 11.5 lakhs from Sanjay Raut’s house
राऊत यांच्या घरी आज रविवारी (31 जुलै) सकाळी 7 वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला. त्यानंतर दिवसभर सलग नऊ तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर सायंकाळी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आणि ईडी कार्यालयात नेले.
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी आणि झाडाझडती दरम्यान संजय राऊत यांच्या घरातून तब्बल साडे अकरा लाख रोख रक्कम जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. ही रक्कम ईडी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली असून त्याबद्दल राऊतांकडून चौकशी केली जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबद्दल अधिकृत घोषणा किंवा माहिती ईडीकडून देण्यात आलेली नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/593069665704100/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवरील कारवाईचे समर्थनही केले. ते आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. “कोणी भाजपमध्ये बोलावलं आहे का? कोणी जर ईडीच्या भीतीने आमच्याकडे येत असेल किंवा भाजपामध्ये जात असेल तर त्यांनी जाऊ नये, असे शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी काही केलं नाही. राऊत जर असे म्हणत असतील तर मग कर नाही त्याला डर कशाला. चौकशीत जे काय आहे ते सत्य बाहेर येईलच, असे शिंदे यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटालाही लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ‘शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे. ‘महाराष्ट्राला बदनाम केलं जात आहे. खोटे कागदपत्र, पुरावे गोळा करून माझ्यावर दबाव आणला जात आहे. मात्र मी झुकणार नाही, तर लढत राहणार. सगळ्यांना माहिती आहे किती वाईट राजकारण सुरू आहे.”
शिवसेनेला संपवण्यासाठी हे सगळं सुरू आहे हे समजतं आहे. भाजपच्या दोन नेत्यांनी माझ्यावर दबाव आणला. त्यासंबंधी 6 महिन्यांपूर्वी व्यंकया नायडू यांना पत्र लिहिलं. माझ्याविरोधात खोटो आरोप लावण्यात आले. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राशी बेईमानी करणार नाही. मला अटक करणार आहेत आणि मी अटक करून घेण्यासाठी जात असल्याचे म्हटले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/593068232370910/