सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील बी ब्लॉक जवळ असलेल्या विसावा कक्षात एका ३५ वर्षीय रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी (ता.31) पहाटेच्या सुमारास घडली. Suicide by hanging in the visawa ward of the government hospital in Solapur
विजय पांडुरंग सोनार (वय ३५ रा. भवानी पेठ, हनुमान नगर) असे मयताचे नाव आहे. रविवारी पहाटे ५ वाजण्यापूर्वी त्याचा मृतदेह विसावा कक्षातील छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तो काही दिवसापासून आजारी होता. शिवाय त्याची ८० वर्षाची आई देखील आजारी होती. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याची पत्नी १० वर्षांपूर्वी माहेरी गेली होती.
शिवाय घर विकल्यामुळे राहण्यास जागा नव्हती. त्यामुळे तो आईसोबत कांही दिवसापासुन रुग्णालयातील विसावा कक्षात राहून उपचार घेत होता.मध्यरात्रीनंतर त्याने छताच्या लोखंडी अंगाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. अशी नोंद सदर बजार पोलिसात झाली. पुढील तपास हवालदार जमादार करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/593484288995971/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ हगलूर येथे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर : हगलूर (ता.तुळजापूर) येथे राहणाऱ्या कांतु निलप्पा राठोड (वय ३५) याने स्वतःच्या शेतात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी (ता.30) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. त्याला अणदूर येथे प्राथमिक उपचार करून संजय पवार (मेहुणा) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केले. या मागचे कारण समजले नाही.
□ मंगळवेढा परिसरातील तरुणाची विष पिऊन आत्महत्या
सोलापूर – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका वीस वर्षीय तरुणाने विष घेऊन आत्महत्या केली ही घटना घरनिकी (ता. मंगळवेढा) येथे घडली. प्रतीक प्रकाश भोसले (वय २० रा. घरनिकी) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी (ता.30) सायंकाळच्या सुमारास त्याने हा प्रकार केला होता. त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो काल रविवारी सकाळी मरण पावला. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.