मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राविषयी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते. आता या विधानाबाबत कोश्यारी यांनी निवेदन जारी करत माफी मागितली आहे. “महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो,” असे कोश्यारींनी म्हटले आहे. या प्रकरणात राज्यपाल एकाकी पडले होते. ‘Forgive this humble civil servant’; Governor Bhagat Singh Koshyari apologized for the mistake
मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई-महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोनच दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने या विरोधात आंदोलन करण्यात आल्यानंतर अखेर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चुक मान्य करीत माफी मागितली आहे.
गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई-महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिले होते. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक असल्याचे त्यांनी या स्पष्टीकरणात म्हटले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या मताशी असहमत असल्याचे म्हटले होते. राज्यपालांच्या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चूक मान्य केली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/593705438973856/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राजस्थानी आणि मारवाडी लोकांना मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकलं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणाच नाही असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. सर्वच पक्षांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला होता. त्यावर राज्यपालांनी आज पदडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
□ चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान
मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चुक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु,भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.
महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगतो राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
□ 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यातून सरकारला 1 लाख 50 हजार 173 कोटींचा एकूण निधी मिळाला आहे. यात अंबानींच्या रिलायन्स जिओनं बाजी मारली. जिओनं 27 हजार 740 MHz स्पेक्ट्रम घेतलं, तर अडानी समूहाने 26 GHz बँडमधील 400 MHz चं स्पेक्ट्रम घेतलंय. एअरटेलनं 19,867 MHz चं स्पेक्ट्रम घेतलं. व्होडाफोन आयडियाने 2668 MHz पर्यंत स्पेक्ट्रम घेतलं.
https://www.facebook.com/109399567404448/posts/593645652313168/