कोल्हापूर/ सोलापूर : हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथील लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय कटरने उचकटून चोरी केलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने राष्ट्रीय महामार्गावर कागल जवळील लक्ष्मी टेकडी परिसरात अटक केली. Person from Solapur arrested for breaking into office of life insurance company in Kolhapur
राजकुमार पंडीत विभुते (वय ४२ रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले साहित्य, इन्शुरन्स कंपनीचे चेकबुकसह मोटारकार असा सुमारे ४ लाख ३४ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी संशयित विभूतेच्या मोटारीची झडती घेतली असता घरफोडीवेळी वापरलेले तीन गॅस सिलींडर, नोजल, रेग्युलेटर, रबरी पाईपसह तयार केलेला सेट, दोन कटर, हेक्सा, ग्राईडर कटर मशीन, लोखंडी कटावणी, कोयता, बॅटरी, चेकबुक तसेच मोटारकार असा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, दि. १२ जुलैला पेठवडगाव येथील एलआयसी या विमा कंपनीचे कार्यालय चोरट्याने गॅस कटरचा वापर करुन फोडले अन् सुमारे ६ लाख ८० हजाराची रोकड, चेकबूक आदी साहित्य चोरी केले होते.
घरफोडीप्रकरणातील संशयित राजकुमार विभुते हा अलिशान मोटारकारने पुणे ते बंगळूरू महामार्गावरुन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली.
पथकाने आज सोमवारी सकाळी सापळा रचून त्याला लक्ष्मीटेकडी परिसरात पकडले. मोटारीची झडती घेतली असता घरफोडीसाठी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे तसेच एलआयसी कंपनीचे चेकबुक व मोटारकार जप्त केले. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर संशयित विभूते याने पेठवडगाव येथील एलआयसी कार्यालय फोडल्याची कबूली दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण चे संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. शिवानंद कुंभार, उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमोल कोळेकर, नितीन चोथे, अजय वाडेकर, सुनिल कवळेकर, ओंकार परब, हिंदूराव केसरे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, महिला पोलीस वैशाली पाटील, शहानाज कनवाडे यांनी केली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/593645652313168/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापुरात शासकीय रुग्णालयातील विसावा कक्षात गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील बी ब्लॉक जवळ असलेल्या विसावा कक्षात एका ३५ वर्षीय रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी (ता.31) पहाटेच्या सुमारास घडली.
विजय पांडुरंग सोनार (वय ३५ रा. भवानी पेठ, हनुमान नगर) असे मयताचे नाव आहे. रविवारी पहाटे ५ वाजण्यापूर्वी त्याचा मृतदेह विसावा कक्षातील छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तो काही दिवसापासून आजारी होता. शिवाय त्याची ८० वर्षाची आई देखील आजारी होती. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याची पत्नी १० वर्षांपूर्वी माहेरी गेली होती.
शिवाय घर विकल्यामुळे राहण्यास जागा नव्हती. त्यामुळे तो आईसोबत कांही दिवसापासुन रुग्णालयातील विसावा कक्षात राहून उपचार घेत होता.मध्यरात्रीनंतर त्याने छताच्या लोखंडी अंगाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. अशी नोंद सदर बजार पोलिसात झाली. पुढील तपास हवालदार जमादार करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/593611622316571/