पुणे : शिंदे गटातील आमदार तानाजी सावंतांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. शक्ती गेल्यानंतर शक्तीप्रदर्शन करून काय उपयोग. सर्व शिवसैनिक हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे आता काही फरक पडणार नाही. आणि ते आहेत तरी कोण? एका आमदाराशिवाय आता त्यांच्याकडे कोणते पद आहे, अश्या शब्दात सावंतांनी टीका केली आहे. ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेतून शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका करत आहेत. Who is Aditya Thackeray? He is an MLA, my office was not destroyed by Shiv Sainiks, but by NCPs: Tanaji Sawant Shaktifresha Shaktipat
आदित्य ठाकरे यांची आज पुण्यातील कात्रज चौकात सभा होणार आहे. हे ठिकाणी तानाजी सावंत यांच्या कार्यालयापासून काही अंतरावर आहे. त्याचवेळी आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कार्यक्रम आहेत. मुख्यमंत्री आज पुण्यात आढावा बैठकीसाठी येणार आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची सभा असून ते तानाजी सावंत यांनाही भेटणार असल्याची माहिती आहे.
तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरे शक्तीप्रदर्शन करत आहेत का? असं विचारण्यात आलं. त्यावर एकेरी उल्लेख करत ते म्हणाले. “आदित्य ठाकरे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नाही”. आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं, त्यांचा तर शक्तीपात झाला आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
त्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा भगवा घालून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझे ऑफिस फोडलं असा दावा शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केला.
तानाजी सावंत म्हणाले की, माझं ऑफिस फोडणं इतके सोप्प नाही. कार्यालय फोडणाऱ्यांनी औकातीत राहावं असं इशारा दिला होता. भविष्यात ज्यांनी कार्यालयावर दगड फेकले त्यांना कळेलच. सत्तेचा माज आम्ही करणार नाही. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी इथे आलो आहे. माझे शिवसैनिक तिथे नव्हते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते असा आरोप त्यांनी केला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/594151612262572/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कात्रजमधील आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयासमोर नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कात्रज चौकातील शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी वेळीच त्यांना रोखले. यानंतर पोलिसांनी याठिकाणी दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करीत शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती.
□ आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर
तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे कोण आहेत? असं विधान केल्याचं सांगितलं असता ते म्हणाले “त्यांना असाच विचार करत राहू दे, भ्रमात राहू दे, आम्ही लक्षही देत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला, ठाकरे कुटुंबाला एकटं पाडण्याचा कट ४० आमदार करत होते. त्यांचे प्रयत्न सुरु असून लोकांचं प्रेम पाहता ते आम्हाला एकटं पडू देणार नाहीत याची खात्री आहे”. लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकजण आम्ही उद्धव ठाकरेंसोबत उभे असून गद्दारी आवडलेली नाही असं सांगत आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले.
३३ दिवस ओलांडूनही या बेकायदेशीर सरकारला तिसरा माणूस सापडलेला नाही. दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट आहे. त्यातही खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न लोकांना पडलेलाच आहे,” असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.
“आता यांचा खरा चेहरा समोर येत आहे. गेले एक महिना या गद्दारांचं उद्धव ठाकरेंविषयी आमच्या मनात आदर आहे, आदित्य ठाकरेंविषयी प्रेम आहे, आदित्य मुलासारखा आहे असं नाट्य सुरू होतं. आता त्यांच्या मनातील खरे विचार लोकांसमोर येत आहेत. त्यांना कारवाई टाळायची होती म्हणून ते स्वतःला शिवसैनिक म्हणत होते. आता तुम्ही त्यांचे खरे चेहरे बघत आहात.”
https://www.facebook.com/109399567404448/posts/594114935599573/