Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मंद्रुप पोलिसांचा राज्य पातळीवरचा सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कार सोलापूर

Mandrup Police State Level Best Crime Achievement Award Solapur

Surajya Digital by Surajya Digital
August 2, 2022
in Hot News, सोलापूर
0
मंद्रुप पोलिसांचा राज्य पातळीवरचा सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कार सोलापूर
0
SHARES
238
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

□ सपोनि नितीन थिटे पोसई जाधव, पो नाईक अविनाश पाटील यांचा गौरव 

 

दक्षिण सोलापूर : सर्वोत्कृष्ट तपास करुन आरोपींना शिक्षेपर्यंत पोचविणाऱ्या राज्यातील कानाकोपऱ्यातील पोलीस अधिकाऱ्यासह अंमलदारांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात मंद्रुप पोलिस ठाण्याचाही सहभाग आहे. Mandrup Police State Level Best Crime Achievement Award Solapur

 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने (सी.आय.डी.) पोलीस संशोधन केंद्र येथे ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ बद्दलचे बक्षिस प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला सी.आय.डी.’चे अतिरीक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेशकुमार मेकला, रंजनकुमार शर्मा, पोलीस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस संशोधन केंद्राचे शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधिक्षक (कायदा व सुव्यवस्था) पल्लवी बर्गे आदी उपस्थित होते.

‘सी.आय.डी.’ने राज्यातून ६४ गुन्ह्यांमधून ८ गुन्ह्यांची ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ बक्षिसासाठी निवड केली होती. निवड झालेल्या ३० पोलीस अधिकारी व अंमलदारांना रितेशकुमार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, गौरवचिन्ह आणि २५ हजार रुपये बक्षिस देण्यात आले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला अमानुषपणे मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी नितिन थिटे व कर्मचाऱ्यांनी मुलीला रुग्णालयातच पोचविले नाही, तर तिला अक्षरशः मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले. आरोपीचा कसून शोध घेत त्याला बेड्याही ठोकल्या.  अवघ्या नऊ महिन्यातच आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षाही मिळवून दिली.

दरम्यान, बालकांचे लैंगिक शोषण, जबरी चोरी, खून, दिव्यांग मुलींचे लैंगिक शोषण अशा विविध गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणाऱ्या विविध जिल्ह्यातील आठ पोलीस ठाण्यांना २५ हजार रुपये रक्कम देऊन गौरविण्यात आले.

 

□ नागनहळली येथे रॉडने मारहाण पिता-पुत्र जखमी

सोलापूर  : नागनहळली (ता.अक्कलकोट) येथे घरासमोर खड्डे खोदताना आमचे फाउंडेशन खाली पडेल असे सांगितल्याच्या कारणावरून लोखंडी पाईप,रॉड आणि दगडाने केलेल्या मारहाणीत नवाब हमीद सातलगाव (वय३५) आणि त्यांचे वडील हमीद सातलगाव (वय ६५) हे दोघे जखमी झाले.
ही घटना सोमवारी (ता. १) सकाळच्या सुमारास घडली. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या घरासमोर खड्डे मारण्याचे काम चालू होते त्यावेळी खड्डे सावकाश मारा, असे म्हणाले असता त्यांना अझरुद्दीन सातलगाव, साहिल अन्सारी, कौसरबानू अन्सारी, तबरेज अन्सारी या चौघांनी मारहाण केली. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

Tags: #Mandrup #Police #State #Level #Best #Crime #Achievement #Award #Solapur#सोलापूर #मंद्रुप #पोलिस #राज्य #पातळी #सर्वोत्कृष्ट #अपराध #सिद्धीपुरस्कार
Previous Post

कोण आदित्य ठाकरे? तो एक आमदार, माझं कार्यालय शिवसैनिकांनी नाही तर राष्ट्रवादीने फोडले : तानाजी सावंत

Next Post

‘पहिले लग्न लपवून दुसऱ्या लग्नासाठी शरीरसंबंधाची परवानगी घेणे हा बलात्कार’

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
‘पहिले लग्न लपवून दुसऱ्या लग्नासाठी शरीरसंबंधाची परवानगी घेणे हा बलात्कार’

'पहिले लग्न लपवून दुसऱ्या लग्नासाठी शरीरसंबंधाची परवानगी घेणे हा बलात्कार'

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697