□ विशेष म्हणजे ओटीपी व कन्फर्मेशन दिलेले नसताना फसवणूक
सोलापूर : दिवसेंदिवस सोलापूर शहरात अज्ञात व्यक्तीकडून एखाद्या खातेदाराची माहिती घेऊन,त्याची बँक अकाउंट ची माहिती घेत,ओटीपी नंबर विचारात क्षणात त्यांच्या अकाउंट मधून पैसे काढण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेष म्हणजे आलेल्या कॉल ला प्रतिसाद म्हणून कोणताही ओटीपी व कन्फर्मेशन दिलेले नसताना सुद्धा एका डॉक्टरला लाख रुपयाची फसवणूक झालीय. Solapur: The limit has been reached… Fraud of half a lakh even when the doctor has not given OTP and confirmation
सोलापुरातील प्रख्यात डॉ. सत्यश्याम श्रीराम तोष्णीवाल (रा.रेल्वे लाईन्स) यांना १९ जून रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात इसमांकडून त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यावर त्यांचे आधार कार्ड,मिलिटरी कार्ड व पॅन कार्डचा फोटो पाठवला. ते कार्ड पाहिले असता त्याच्यावर सतीश बलवीर सिंग असे नाव होते. ते कार्ड वरून इसम हा मिलिटरी मध्ये नोकरीस आहे अशी फिर्यादीची खात्री झाली. त्यानंतर मी एक्स सर्विस मॅन बोलत आहे. मला आमच्या पन्नास लोकांच्या हृदयाची तपासणी करावयाची आहे, असे सांगून त्याकरिता किती खर्च येईल असे हिंदी मधून विचारणा केली.
डॉक्टरांनी सर्व माहिती त्यांना सांगत असतानाच त्यांनी आम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा करावयाचे आहेत. त्याकरता तुमचा फोन पे नंबर आहे का? असल्यास व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. फिर्यादीने कॉल केला तेव्हा फिर्यादीस तो इसम समोर दिसत नव्हता. याबाबत फिर्यादीने विचारणा केल्यास त्यांनी फोन पे अकाउंट ओपन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे व्हिडिओ कॉल चालू असताना त्याने फिर्यादीस लॉगिन करण्यास सांगितले. लॉगिन केल्यानंतर फिर्यादीस शंभर रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या आयसीआय बँक खात्यावर दोनशे रुपये जमा झाले असल्याबाबत तपासण्या सांगितले.
फिर्यादीने तपासले असता खात्यावर दोनशे रुपये जमा झाले असे सांगताच फिर्यादीच्या एचडीएफसी बँक खात्यातून १ लाख ३० हजार रुपये अज्ञात व्यक्तीस कोणतीही ओटीपी व कन्फर्मेशन दिलेले नसताना देखील कट झाले. त्यावर फिर्यादीने अनेक वेळा कॉल केला असता,फोन बंद लागत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच. डॉ तोष्णीवाल यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पोपट दहातोंडे हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/594334665577600/
□ तू इथे बस का थांबवली असे म्हणत बसचालकाला मारहाण
सोलापूर : कन्ना चौकातील भू.म.पुल्ली प्रशालेतील मुलींना घेऊन जाताना ‘तू इथे बस का थांबवली, मी कोण आहे, तुम्ही ओळखत नाही का’ असे म्हणून दमदाटी केली. तसेच बसमधून मुलींना घेऊन जाताना दगड मारून जखमी केल्याची फिर्याद बाळू विठोबा भोसले (रा. खडकी, ता.तुळजापूर) यांनी जेलरोड पोलिसांत दिली.
याप्रकरणी अंबादास भगवान शिंदे (रा.भुलाभाई चौकाजवळ,सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शासकीय कामात अडथळा करून अंबादास पळून गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चिंताकिंदी तपास करीत आहेत.
□ थांबलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने दिली जोरात धडक
सोलापूर : विजयपूर महामार्गावरील ब्रीज उतरून मंगळवेढ्याकडे जाण्यासाठी थांबलेल्या ट्रकला (एमएच ४०, बीएल ९८६६) मागून येणाऱ्या ट्रकने (एमएच १३, सीजे ९०८५) जोरात धडक दिली. चालकाने भरधाव वेगाने व हयगयीने, निष्काळजीपणे ट्रक चालविल्याने हा अपघात झाला. यात तो ट्रकचालक स्वत:च जखमी होण्यास कारणीभूत असल्याची फिर्याद गोरख प्रल्हाद सूर्यवंशी (रा. भांडवली, ता.माण, जि. सातारा) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. सहाय्यक फौजदार जाधव तपास करीत आहेत.
□ ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दागिन्यांची चोरी
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी गेल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास शुभांगी संजय माळगे (रा.बसवेश्वरनगर, मित्रनगर, शेळगी) यांच्या गळ्यातील ३२ हजार रुपयांचे गंठण चोरीला गेले.
तसेच रात्री आठच्या सुमारास त्रिवेणी संजय लोकर्ती यांची पर्स, दागिने व रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद शुभांगी माळगे यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. पोलिस नाईक डोके तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/594163382261395/