Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मुलीचे खोटे लग्न लावून लुटणारी टोळी उघडकीस, सोलापुरातील मायलेकीसह पाचजणांवर गुन्हा

The gang of robbing a girl by falsely marrying them was exposed, five persons including Mileki from Solapur were charged with the crime.

Surajya Digital by Surajya Digital
August 3, 2022
in Hot News, गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
मुलीचे खोटे लग्न लावून लुटणारी टोळी उघडकीस, सोलापुरातील मायलेकीसह पाचजणांवर गुन्हा
0
SHARES
483
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : आर्थिक स्वार्थासाठी पोटच्या मुलीचे खोटे लग्न लावून लाखो रूपये लुटणा-या मायलेकीस पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. सांगलीतील विटा पोलिसांत पाचजणांवर गुन्हा दाखल दाखल झाला आहे.  The gang of robbing a girl by falsely marrying them was exposed, five persons including Mileki from Solapur were charged with the crime.

 

सांगलीतील हिवरे येथील दत्तात्रय नागेश हसबे (वय ३१, रा. हिवरे, ता. खानापूर) या तरुणाला एक लाख ७५ हजार रुपयांना गंडा घातल्याची तिने फिर्याद दिली. या प्रकरणात सोलापूर व कर्नाटक राज्यातील पाच जणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

जयश्री गदगे (रा. जुगुल, ता. चिकोडी, कर्नाटक), सुनील दत्तात्रय शहा (रा. निपाणी, कर्नाटक), धनम्मा उर्फ धानुबाई नागनाथ बिराजदार, मुलीची आई दीपाली विकास शिंदे व मुलगी प्रियांका विकास शिंदे (सर्व रा. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. मुलीची आई दीपाली शिंदे (वय ४०) व नववधू प्रियांका शिंदे (वय २१) यांना विटा पोलिसांनी अटक केली आहे.

हिवरे येथील दत्तात्रय हसबे या तरुणाचा काही केल्या विवाह जमत नव्हता. त्यामुळे हसबे हा त्याचा मित्र संजय खिलारी याच्या ओळखीच्या कर्नाटकातील जयश्री गदगे या लग्न जुळविणाऱ्या महिलेकडे दोघेजण गेले. त्यावेळी संबंधित महिलेने सोलापूर येथे मुलगी चांगली आहे. परंतु, मुलीच्या घरच्यांना एक लाख व लग्न जुळविणारे एजंट सुनील शहा व धनम्मा उर्फ धानुबाई बिराजदार यांना ७० हजार रुपये द्यावे लागतील,असे सांगितले. मोबाइलवर मुलगी प्रियांका शिंदे हिचा फोटो पाहून हसबे याने पैसे देण्यास होकार दिला.

मुलगीला हिवरेत येण्यासाठी हसबे याने जयश्रीला ऑनलाइन पाच हजार रुपये दिले. दि. २७ जुलै रोजी रात्री नऊ वाजता संशयित जयश्री गदगे, सुनील शहा, धनम्मा बिराजदार, मुलगी प्रियांका व तिची आई दीपाली शिंदे हे गावात आले. त्याच रात्री दोघांचा विवाह लावून दिला.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

३० जुलै रोजी दीपालीही हिवरेत आली. तिने कपडे घ्यायची आहेत, असे सांगून मुलीला घेऊन गेली. त्यांच्यासोबत दत्तात्रय व नातेवाईक गेले. दीपालीने भिवघाटातून प्रियांकाला सोलापूर घेऊन जाण्याची तयारी केली. फिर्यादी दत्तात्रयने तिला विचारणा केली असता खोटे लग्न लावून देण्यासाठी २० हजार रुपये दिल्याचे दीपालीने सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दत्तात्रय हसबे याने विटा पोलिसांत जयश्री गदगे, सुनील शहा, धनम्मा बिराजदार, दीपाली शिंदे व प्रियांका शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दीपाली व प्रियांका शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

□ ट्रॅव्हल्स गाडी अचानक जळून खाक

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस (ता. दौंड) भागवतवाडी येथे प्रवासी ट्रॅव्हल्स गाडीला अचानक आग लागून ती खाक झाली. ही घटना मंगळवारी (दि.२) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. यातील १७ प्रवासी सुखरूप असून या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.

 

मंगळवारी रात्री १ च्या दरम्यान पुणे येथील भोसरीतुन अहमदपूरला जात असताना ओम साईराम कंपनीची ट्रॅव्हल्स बस (एमएच ११ सीएच ९९६६) ही पाटस येथून पुढे जात होती. यावेळी चालू ट्रॅव्हल्स गाडीच्या बोनटमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे गाडीला आग लागली. गाडी चालक विठ्ठल पंढरीनाथ वडारी यांना हे समजताच त्यांनी गाडी रोडच्या बाजूला घेऊन थांबवली. प्रसंगावधान साधून गाडीमध्ये असणाऱ्या क्लिनर सचिन प्रकाश कांबळे यांनी गाडीत असणाऱ्या १७ प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले व पाणी मारून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.

तेवढ्यात आगीने मोठा पेट घेऊन संपूर्ण गाडी जळून खाक झाली. या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती यवतच्या पोलीसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार, हवालदार भाऊसाहेब बंडगर, पोलीस अजित काळे, समीर भालेराव, वाहतूक पोलीस व अग्नीशमक दल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

Tags: #gang #robbing #girl #byfalsely #marrying #exposed #five #persons #Mileki #Solapur #charged #crime.#मुली #खोटे #लग्न #लुटणारी #टोळी #उघडकीस #सोलापूर #मायलेकी #सांगली #विटा #पाचजणांवर #गुन्हा
Previous Post

सोलापूर : हद्द झाली… डॉक्टरानी ओटीपी व कन्फर्मेशन दिलेले नसतानाही सव्वा लाखाची फसवणूक

Next Post

पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत तीन बिहारी मजूरांच मृत्यू, रुळावर आढळल्या बाटल्या

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत तीन बिहारी मजूरांच मृत्यू, रुळावर आढळल्या बाटल्या

पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत तीन बिहारी मजूरांच मृत्यू, रुळावर आढळल्या बाटल्या

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697