Friday, August 12, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत तीन बिहारी मजूरांच मृत्यू, रुळावर आढळल्या बाटल्या

Pandharpur: Three Bihari laborers killed in train collision, bottles found on track

Surajya Digital by Surajya Digital
August 4, 2022
in Hot News, सोलापूर
0
पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत तीन बिहारी मजूरांच मृत्यू, रुळावर आढळल्या बाटल्या
0
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात रुळावरून जाणाऱ्या 4 जणांना रेल्वेने धडक दिली. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. रेल्वे रुळावर दारूच्या बाटल्याही आढळल्या आहेत. त्यामुळे हे 4 ही जण दारू पित बसले असताना हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत. Pandharpur: Three Bihari laborers killed in train collision, bottles found on track

 

यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी अवस्थेत दोघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यापैकी एकाची उपचारादरम्यान प्राणज्येत मालवली. त्यामुळे या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघात की घातपात याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.  हेमलाल गोविंद ठाकूर (वय ३०), पंकज रामचरण मिरवी (वय २४) व सोनू तुलाराम यादव (वय १८) असे तिघांचा मृताची नावे  असून गोकूल फुलसिंग मिरवी (वय २०) या तरुणावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.

 

रुळाजवळ दारुच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत. त्यामुळे या मजूर दारु प्यायले असावेत असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. चौघे मजूर रेल्वे रुळावरुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीने त्यांना उडवले असल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले आहे. मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

एका गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जण मजूर असून ते मूळचे बिहारचे असल्याचं कळतं. पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात रुळावरुन जाणाऱ्या चार बिहारी मजुरांना रेल्वेने धडक दिली.  हे चौघे मजूर रेल्वे रुळावरुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीने त्यांना उडवले असल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले आहे.

 

■ विवाहित महिलेची आत्महत्या

 

सोलापूर – फौजदार चावडी परिसरातील स्नेहसृष्टी पार्क येथील विहिरीत एका ५० वर्षीय विवाहित महिलेने उडी टाकून आत्महत्या केली.ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

सुवर्णा शिवाजी राऊत (वय ५० रा.संतोषनगर बाळे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे ती. काल रात्री घरातून निघून गेली होती. आज सकाळी तिचा मृतदेह पद्मावती नगर परिसरातील विश्वनाथ कांबळे यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला.
मयत सुवर्णा हिच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार आहे. ते दोघेही हेअर कटिंग दुकानात कामाला जातात. घरच्या विकट परिस्थितीला कंटाळून तिने हा प्रकार केला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. फौजदार चावडी पोलिसात याची नोंद झाली. हवालदार घुगे पुढील तपास करीत आहेत.

■ कासेगाव येथे कटींग दुकानदाराची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – पत्नी नांदत नसल्याने तसेच दारूच्या नशेत एका ३२ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे सोमवारी (ता. 1) सायंकाळच्या सुमारास घडली.
नागनाथ भगवान जाधव (वय ३२ रा. कासेगाव) असे मयताचे नाव आहे. काल सायंकाळी त्याचा मृतदेह घरातील छताच्या लाकडी वाशाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नागनाथ याला दारूचे व्यसन असून त्याचा हेअर कटिंगचा व्यवसाय आहे.
दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन काही दिवसापूर्वी माहेरी गेली होती. त्यामुळे नागनाथ हा घरात एकटाच होता. काल सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून हवालदार लाखाडे पुढील तपास  करीत आहेत.
Tags: #Pandharpur #Three #Bihari #laborers #killed #train #collision #bottles #track #solapur#पंढरपूर #रेल्वे #धडक #तीन #बिहारी #मजूर #मृत्यू #रुळावर #आढळल्या #दारू #बाटल्या
Previous Post

मुलीचे खोटे लग्न लावून लुटणारी टोळी उघडकीस, सोलापुरातील मायलेकीसह पाचजणांवर गुन्हा

Next Post

ATM machine एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला; मोहोळ पोलिसाने दोघांना घेतले ताब्यात

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
ATM machine एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला; मोहोळ पोलिसाने दोघांना घेतले ताब्यात

ATM machine एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला; मोहोळ पोलिसाने दोघांना घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul    

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697