मोहोळ : मोहोळ शहरातील कुरुल रोडवर असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेची एटीएम फोडण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपीला तीन दिवसांमध्ये पकडण्यात मोहोळ पोलिसांना यश आले आहे. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. An attempt to break into an ATM machine failed; Mohol police took both of them into custody
पांडुरंग शिवाजी ढुने व गणेश सुरेश अनभुले (रा. सौंदणे ता. मोहोळ) असे त्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही घटना शनिवारी (३० जुलै) च्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरूल रोडवर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. त्याच्या शेजारीच त्या बँकेचे एटीएम मशीन आहे. त्या मशीनवर दगड घालून मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु सेन्सॉरमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस धावून गेले पोलिसांचा सुगावा लागताच चोरटे पसार झाले होते.
यापूर्वीही चोरीच्या घटना घडण्याअगोदर आठ दिवसापूर्वी त्याच ठिकाणी मशीन फोडण्याचा यशस्वी प्रयत्न झाला होता. या घटनेची मोहोळ पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि तपास यंत्रणा सतर्क केली. विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
मिळालेल्या फुटेजवरुन माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. इंदापूरपर्यंत मोहोळ पोलिसांचा तपास सुरू होता. त्यावेळी त्यांना असे दिसणारे आरोपी हे सौंदणे गावातील असल्याचे त्यांच्या खाबऱ्यामार्फत सुगावा लागला. त्यानुसार त्यांनी आरोपीचे नाव पत्ता शोधून काढला आणि पहाटेच्या वेळेस त्यांना त्यांच्या घरातून मोहोळ पोलिसांनी पकडले.
पांडुरंग शिवाजी डुने व गणेश सुरेश अनभुले (रा. सौदणे ता. मोहोळ) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोहे कॉ शरद ढावरे, पांडुरंग जगताप, हरिश थोरात यांनी केली या घटनेचा तपास पी एस आय खर्गे हे करित आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/594773718867028/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/594809638863436/
□ आर्थिक परिस्थितीमुळे विवाहितेचे आत्महत्या
सोलापूर – फौजदार चावडी परिसरातील स्नेहसृष्टी पार्क येथील विहिरीत एका ५० वर्षीय विवाहित महिलेने उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.2) सकाळी उघडकीस आली.
सुवर्णा शिवाजी राऊत (वय ५० रा.संतोषनगर बाळे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे ती. रात्री घरातून निघून गेली होती. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह पद्मावती नगर परिसरातील विश्वनाथ कांबळे यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. मयत सुवर्णा हिच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार आहे. ते दोघेही हेअर कटिंग दुकानात कामाला जातात.
घरच्या बिकट परिस्थितीला कंटाळून तिने हा प्रकार केला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. फौजदार चावडी पोलिसात याची नोंद झाली. हवालदार घुगे पुढील तपास करीत आहेत .
□ कासेगाव येथे कटींग दुकानदाराची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – पत्नी नांदत नसल्याने तसेच दारूच्या नशेत एका ३२ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
नागनाथ भगवान जाधव (वय ३२ रा. कासेगाव) असे मयताचे नाव आहे. सायंकाळी त्याचा मृतदेह घरातील छताच्या लाकडी वाशाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नागनाथ याला दारूचे व्यसन असून त्याचा हेअर कटिंगचा व्यवसाय आहे. दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन काही दिवसापूर्वी माहेरी गेली होती. त्यामुळे नागनाथ हा घरात एकटाच होता. काल सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून हवालदार लाखाडे पुढील तपास करीत आहेत.