□ सपोनि नितीन थिटे पोसई जाधव, पो नाईक अविनाश पाटील यांचा गौरव
दक्षिण सोलापूर : सर्वोत्कृष्ट तपास करुन आरोपींना शिक्षेपर्यंत पोचविणाऱ्या राज्यातील कानाकोपऱ्यातील पोलीस अधिकाऱ्यासह अंमलदारांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात मंद्रुप पोलिस ठाण्याचाही सहभाग आहे. Mandrup Police State Level Best Crime Achievement Award Solapur
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने (सी.आय.डी.) पोलीस संशोधन केंद्र येथे ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ बद्दलचे बक्षिस प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला सी.आय.डी.’चे अतिरीक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेशकुमार मेकला, रंजनकुमार शर्मा, पोलीस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस संशोधन केंद्राचे शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधिक्षक (कायदा व सुव्यवस्था) पल्लवी बर्गे आदी उपस्थित होते.
‘सी.आय.डी.’ने राज्यातून ६४ गुन्ह्यांमधून ८ गुन्ह्यांची ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ बक्षिसासाठी निवड केली होती. निवड झालेल्या ३० पोलीस अधिकारी व अंमलदारांना रितेशकुमार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, गौरवचिन्ह आणि २५ हजार रुपये बक्षिस देण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/594034668940933/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला अमानुषपणे मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी नितिन थिटे व कर्मचाऱ्यांनी मुलीला रुग्णालयातच पोचविले नाही, तर तिला अक्षरशः मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले. आरोपीचा कसून शोध घेत त्याला बेड्याही ठोकल्या. अवघ्या नऊ महिन्यातच आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षाही मिळवून दिली.
दरम्यान, बालकांचे लैंगिक शोषण, जबरी चोरी, खून, दिव्यांग मुलींचे लैंगिक शोषण अशा विविध गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणाऱ्या विविध जिल्ह्यातील आठ पोलीस ठाण्यांना २५ हजार रुपये रक्कम देऊन गौरविण्यात आले.
□ नागनहळली येथे रॉडने मारहाण पिता-पुत्र जखमी