हिंगोली : पत्नीचे निधन सतरा वर्षापूर्वी नागपंचमी दिवशीच झाले. आता या नागपंचमीला पत्नीची आठवण खूप अनावर झाल्याने पतीने पत्नीचा फोटो झाडाखाली समोर ठेवून त्याने पंचमी दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीच्या आठवणीत शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. Hingoli Solapur, obsessed with memories of his wife on Nag Panchami, committed suicide with the photo in front of him
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय दादाराव शिंदे यांनी वयाच्या 45 व्या वर्षी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याच्या पद्धतीने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
संजय यांची पत्नी 2005 मध्ये पंचमीच्या दिवशी स्वर्गवासी झाली. तिच्या आठवणीतच संजय हे आपले आयुष्य काढत होते. त्यांना काल तिची आठवण अनावर झाल्याने त्यांनी झाडाखाली पत्नीसोबतचा आपला फोटो ठेवला. त्यावर आपली लग्नाची तारीख टाकली. पत्नीची जन्मतारीख टाकली. त्याच झाडाला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. काल पंचमीच्या दिवशी त्यांनी आयुष्य संपवले.
पती-पत्नीचे नाते हे अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे असते. सात जन्म सोबतीची शपथ घेत हे सुरू होते. पत्नीनंतर अनेक वर्षे झगडत जगलेल्या पतीने आपले आयुष्य असे संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संजय यांचे मोठे बंधू प्रभाकर दादाराव शिंदे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून असं म्हटलं आहे की, त्यांची हयात असलेली दुसरी पत्नी अलका संजय शिंदे यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून माझ्या भावाने आत्महत्या केली आहे.
भाऊ प्रभाकर यांच्या फिर्यादीवरून अलका यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.संजय यांच्या पश्चात दोन मुलं व एक मुलगी असा परिवार आहे. ते शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या निधनाने गावात शोककला पसरली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/594909698853430/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापुरात पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
सोलापूर : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तसेच पत्नी, तिचा प्रियकर व तिच्या भावाने दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळुन पतीने राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोलापुरात घडलीय.
दत्ता सुखदेव शेळके (रा. सांगोला) असे मयताचे नाव आहे. याबाबत मयताचा चुलत भाऊ दादासाहेब शेळके यांनी पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून मयताची पत्नी, आबासाहेब बिरा खरात, दादा ईश्वर धुलगुडे यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला तालुक्यातील एका गावातील येथील दत्ता सुखदेव शेळके याचे लग्न २०१५ मध्ये झाले होते. १५ दिवसांपूर्वी दत्ता याने भाऊजी व चुलत भाऊ दादासाहेब शेळके यांना भेटून तसेच पत्नीचे गावातील आबासाहेब बिरा खरात नावाच्या युवकासोबत अनैतिक संबंध असून त्या दोघांपासून जीवितास धोका असल्याचे सांगितले होते.
मयताची भावजी अंकुश हांडे यांनी दत्ताच्यासमोर त्याच्या पत्नीला समजावून सांगत असताना माझ्या नवऱ्याने दारू सोडावी, नाहीतर मी माझ्या मनाला वाटेल तसे वागणार असे उलट उत्तर देत ती रागात निघून गेली होती.
या समजावण्यात काही फरक पडला नव्हता. पत्नीचे अनैतिक संबंध वाढत चालल्याने गावात उलट-सुलट चर्चा होत होती. दत्ता जास्तच दारूच्या आहारी गेला होता. त्यानंतर दादा धुलगुडे तसेच आबासाहेब खरात या दोघांनी अचकदाणी फॉरेस्टमध्ये दत्ताला हाताबुक्क्यांनी मारहाण करून तू तुझ्या पत्नीवर संशय घेवू नकोस नाहीतर आम्ही दोघेजण तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती.
२३ जुलै रोजी पहाटे ४. ३० च्या सुमारास चुलते ज्ञानेश्वर आबा शेळके यांनी दादासाहेब शेळके यांना फोन करून दत्ता हा घरात बेशुद्ध आहे, त्याने मान टाकली आहे, तू बघायला ये असे सांगितले. दत्ता सुखदेव शेळके यास उपचारासाठी आटपाडी येथील सरकारी दवाखान्यात घेवून गेले. दत्ता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मयत दत्ता यास सांगोला येथील सरकारी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी तपासून तो गळफास घेतल्याने मयत झाल्याचे सांगितले. याबाबत मयताचा चुलत भाऊ दादासाहेब मारुती शेळके यांनी मयताची पत्नी, आबासो बिरा खरात, दादा ईश्वर धुलगुडे यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/594944065516660/