मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांची ईडी कोठडी आज संपली होती. ईडीने राऊतांना पीएमएलए कोर्टात हजर केले. तेव्हा कोर्टाने संजय राऊतांच्या कोठडीत वाढ केली आहे. Sanjay Raut’s rise in ED custody, Sanjay Raut lashed out at the security guards
1034 कोटींच्या पत्राचाळ प्रकरणात कोर्टाने संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. सुनावणीनंतर राऊतांना बाहेर आणले, त्यावेळी ते सुरक्षा रक्षकांवर भडकले. त्यांची सुरक्षा रक्षकांबरोबर बाचाबाची झाली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना गाडीत बसवले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. पत्राचाळ परवानगीसाठी प्रवीण राऊतांकडून संजय राऊतांनी मोठी रक्कम घेतल्याची शक्यता ईडीने वर्तवली आहे. सुरक्षारक्षकासोबत बाचाबाची झाली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सुरक्षारक्षाकने लगेच त्यांना गाडीमध्ये बसायला सांगितलं, मात्र त्यावरून राऊत त्याच्यावर भडकलेले दिसले.
संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. ८) ईडी कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने रविवारी (31 ऑगस्ट) रोजी अटक केली होती त्यानंतर कोर्टात हजर केले असता ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष इडी कोर्टात हजर केले. संजय राऊत कोर्टात धनुष्य बाण चिन्ह असलेला भगवा मफलर घालून आले होते. आपण कोर्टात आल्याचै लक्षात येताच तो मफलर त्यांनी काढला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/595470778797322/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सुनावणी सुरू झाली. तपासात नवीन आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आलीये तसंच काही व्यक्तींची आणि संजय राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. याकरता कोठडीत वाढ करुन देण्यात आली आहे. अलिबाग येथे जमिन घेतली तेव्हा जमिन मालकाला १.१७ कोटी रुपये रोख दिल्याचे ईडीने तपासात उघड झाल्याने सांगितले आहे.
राऊत यांच्या वकिलांनी कोठडीस आक्षेप घेतला. आमच्या कोठडीची गरज नाही. तुम्ही जेव्हा चौकशीला बोलवाल तेव्हा येऊ शकतो, असा युक्तिवाद केला. स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनी युक्तिवाद सुरू केला. त्यावेळी स्वप्ना पाटकर या गोरेगाव पत्र खटल्यातील मुख्य साक्षीदार आहेत. संजय राऊत माझ्या अशिलाला धमकावत होते, असे वकिलांनी न्यायालयाला सांगितले आहे. संजय राऊत कोठडीत असताना ते कसे धमकावू शकतात, असा सवाल न्यायालयाने स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांना विचारला आहे.
न्यायालयात सुनावणी दरम्यान राऊत म्हणाले, मला ज्या ठिकाणी ठेवले आहे, तिथे हवा खेळती नाही. कारण, मला हृदयविकाराचा त्रास असल्याने श्वास घेण्यास त्रास होत आहे. यासंदर्भात ईडीमधील अधिकाऱ्यांना दिल्याची त्यांनी सांगितले आहे.मला ठेवलेल्या ठिकाणी योग्य व्हेंटिलेशन नाही!’, असा दावा राऊतांकडून करण्यात आला. मात्र त्यांना एसीची सुविधा पुरवण्यात आली असल्याचे सांगत ईडीने राऊतांच्या आरोपांवर थेट उत्तर दिले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/595446532133080/