Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद : सोलापूरचे उदय उमेश लळित होणार सुप्रीम कोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश

Proud for Solapurans: Uday Umesh Lalit of Solapur will be the new Chief Justice of the Supreme Court

Surajya Digital by Surajya Digital
August 4, 2022
in Hot News, सोलापूर
0
सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद : सोलापूरचे उदय उमेश लळित होणार सुप्रीम कोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश
0
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

सोलापूर : सोलापूरचे उदय उमेश ललित भारताचे नवीन सरन्यायाधीश होणार आहेत. सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी ललित यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून केली आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे ही शिफारस करण्यात आली आहे. याच महिन्यात एन. व्ही. रमण्णा निवृत्त होणार आहेत. Proud for Solapurans: Uday Umesh Lalit of Solapur will be the new Chief Justice of the Supreme Court

 

भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून सोलापूरचे सुपुत्र उदय उमेश लळित हे नामनिर्देशित झाले असून, ऑगस्टमध्ये ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

सोलापुरातील मानांकित ह.दे. प्रशालेचे माजी विद्यार्थी उदय उमेश लळीत देशाचे सरन्यायधीश होणार असून समस्त सोलापूरकरांसाठीही अभिमानास्पद आहे.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे पुढचे मुख्य न्यायाधीश मनोनित आहेत. न्यायमूर्ती लळीत हे मूळचे सोलापूरचे असून लळीत यांच्या रूपाने देशाच्या न्यायव्यवस्थेतील चौफ जस्टिस ऑफ इंडिया हा सर्वोच्च बहुमान सोलापूरला मिळणार आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

सोलापूर व लळीत परिवाराच्या एक शतकाचे नातेसंबंध या नियुक्तीने उजळले गेले आहे. लळीत परिवार १९१९ साली पनवेलजवळील आपटा या गावातून सोलापुरात आला. रंगनाथ विष्णू लळीत हे सोलापुरात आले व त्यांनी येथे वकिली सुरू केली. त्यानंतरच्या लळीत कुटुंबातील पुढील सर्व पिढ्यांनी विधी क्षेत्रातच कार्य केले. सर्वोच्च न्यायालयाचे नियोजित चीफ जस्टिस उदय लळीत यांचे वडील उमेश लळीत हे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती होते.

 

आणीबाणीच्या काळात घोषणा दिल्या म्हणून दाखल झालेल्या खटल्यात संबंधित लोकांना निर्दोष सोडल्याचा निकाल दिल्याने त्यांच्यावर सरकारचा रोष होता. सर्वोच्च न्यायालयात ते प्रॅक्टिस करत होते. सीबीआयचे वकील म्हणून त्यांनी लढवलेला टूजी स्पेक्ट्रम खटला गाजला.

त्यानंतर लळीत यांची न्यायमूर्तिपदी निवड झाली. त्यांच्या कारकिर्दीत शाहबाने खटल्याचा निकाल विशेष गाजला होता. उदय लळीत यांची चीफ जस्टिसपदी निवड झाल्याचा आनंद आहे. लळीत कुटुंबाची चौथी पिढीदेखील वकिली क्षेत्रात कार्यरत आहे, अशी माहिती सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या सविता लळीत यांनी माध्यमांना दिली.

□ उदय लळीत यांच्यविषयी सोलापूरकराच्या तोंडून माहिती

सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी उदय लळित यांच्या संबंधीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, माझ्या आजोबापासून लळित कुटुंबाचा माने कुटुंबाशी संबंध आहेत. लळित यांनी वकिली क्षेत्रात नाव कमाविले होते. उदय लळित यांचे आजोबा अण्णासाहेब यांना शहरात मानसन्मान होता.

माझे बंधू कै. तानाजी आणि ॲड. भगवान वैद्य हे १९६९ – ७० साली हरिभाई देवकरण प्रशालेत एका वर्गात शिकत होते. त्यांची मैत्री होती, असेही धनंजय माने म्हणाले. लळित यांचे कुटुंबीय लकी चौक ते हुतात्मा चौक या मार्गावर वास्तव्यास होते. त्यांच्या वहिनी सविता लळित या सोलापूर जनता बँकेच्या चेअरमन होत्या. आता त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील बाजूस समर्थनगर येथे वास्तव्यास असल्याचेही सांगितले.

 

Tags: #ProudSolapurans #UdayUmeshLalit #Solapur #new #ChiefJustice #SupremeCourt#सोलापूरकरांसाठी #अभिमानास्पद #सोलापूर #उदयउमेशलळित #सुप्रीमकोर्ट #नवे #मुख्यन्यायाधीश
Previous Post

संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ, संजय राऊत सुरक्षा रक्षकांवर चांगलेच भडकले

Next Post

पंढरपूर : बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने पटवर्धन कुरोली, देवडे परिसरात घबराट

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पंढरपूर : बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने पटवर्धन कुरोली, देवडे परिसरात घबराट

पंढरपूर : बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने पटवर्धन कुरोली, देवडे परिसरात घबराट

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697