□ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले ठसे, नागरिकांची गस्त
पंढरपूर : पटवर्धन कुरोली व देवडे (ता. पंढरपूर) परिसरात मंगळवारी मध्यरात्री बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने पटवर्धन कुरोली, देवडे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. Pandharpur: Panic in Patwardhan Kuroli, Devde area after sighting of a leopard-like animal
मंगळवारी (ता.2) मध्यरात्री दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या दोघांना बिबट्यासदृश्य प्राणी रस्त्यावरून जात असताना दिसला. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या वस्तीवरील शेतकऱ्यांना दूरध्वनीद्वारे ही माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रात्रभर गस्त घालत जनावरे, घरांना पहारा दिला. अचानक हा प्राणी दिसल्याने नागरिक, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
देवडे (ता. पंढरपूर) येथील पांडुरंग गायकवाड यांना मुतखड्याचा त्रास होत असल्याने राहुल सोनटक्के हे त्यांना पटवर्धन कुरोली येथील दवाखान्यात उपचारासाठी रात्री अकराच्या दरम्यान घेऊन जात होते. समोर खड्डा आल्याने त्यांनी त्यांची चारचाकी गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी शेवतेच्या बाजूने पटवर्धन कुरोली नदी पात्राकडे हा बिबट्यासदृश्य प्राणी पटवर्धन कुरोली, देवडे रस्ता क्रॉस करून जाताना दिसला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/595580112119722/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अचानक हा प्राणी समोर दिसल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. ते इतरांना फोन करतानाही त्यांना बोलता येत नव्हते. त्यानंतर त्यांनी परिसरातील नागेश उपासे व इतर शेतकऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सर्व शेतकऱ्यांना जागे केले व परिसरातील रस्त्यावर तोफा उडवून नागरिकांचे टोळके करून रात्रभर गस्त घालत पहारा दिला.
सकाळी घडलेला प्रकार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर वन विभागाचे वनमजूर दिलखुश मुलाणी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हा प्राणी आढळलेल्या परिसराची पाहणी केली. शेताच्या परिसरात आढळलेले ठसेही घेतले व हे ठसे बिबट्यासदृश्य प्राण्याचेच असल्याचे त्यांनी नागरिकांना सांगितल्याचे नागेश उपासे यांनी सांगितले.
त्यामुळे नागरिकांनी येत्या काही दिवसात खबरदारी घेत रात्री एकटे न फिरण्याचा सल्ला त्यांनी दिला. रात्री अचानक देवडे, पटवर्धन कुरोली परिसरात हा प्राणी आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर त्या परिसरात जाऊन पाहणी करून त्या प्राण्याचे ठसे घेतले आहेत. ते ठसे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे पाहणीसाठी पाठविले आहेत. त्यानंतर तो कोणता प्राणी आहे, हे निश्चित होईल. मात्र सध्या आम्ही परिसरातील नागरिकांना आपली घरे, जनावरे यांचे संरक्षण करत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे दिलखुश मुलाणी (वनमजूर, पंढरपूर वन विभाग) यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/595560072121726/