□ माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुखांना मोठा झटका
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात उध्दव ठाकरे गटाचे खाते उघडले आहे. दक्षिण सोलापूर तालुका युवासेना प्रमुख धर्मराज बगले यांनी चिंचपूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. Gram Panchayat Election Results; Thackeray group opens account in Solapur, Raut group flag in Barshi
दक्षिण सोलापुरातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्या 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय झाला आहे. तर भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका बसला आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांच्या 62 तालुक्यांमधील 238 ग्रामपंचायतींसाठी मतदान काल (4 ऑगस्ट) पार पडले. या निवडणुकीचा संपूर्ण निकाल रात्रीपर्यंत लागणार आहे.
शिवसेना पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचे हा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे, शिंदे गटातील बंडानंतर शिवेसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहहे. आमदारांसह 12 खासदारांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला आहे, तसेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ, भाईंदर आदी पालिकेतील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवेसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
पण अशात सोलापुरातून शिवसेनेसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. या ग्रामपंचायतीत 7 पैकी 7 जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. त्यामुळं शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून, शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते, माजी सहकारमंत्री, दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. सोलापुरात देशमुख यांचे वर्चस्व आहे. सोलापूर जिल्ह्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. या ग्रामपंचायतीत 7 पैकी 7 जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. त्यामुळं भाजप व शिंदे गटाला धक्का बसला आहे. तर शिवसेनेत आनंद, जल्लोष व्यक्त केला जात आहे.
□ बार्शीत राऊत गटाचा झेंडा
सोलापूर जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. दुसरीकडे बार्शी तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतीवर मात्र राऊत गटाने झेंडा फडकवला आहे. बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाचा याठिकाणी विजय झाला आहे. तर माजी आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा पराभव झाला आहे. पानगाव ग्रामपंचायतीमध्ये राऊत गटाचे 11 तर सोपल गटाचे 4 सदस्य विजयी झाले आहेत. तर वांगरवाडी – तावरवाडी ग्रामपंचायतीत सातही जागांवर राऊत गटाचा विजय झाला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/596082525402814/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, राज्यातील सत्तापेच कायम असतानाच १५ जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. पुणे – १७ , सोलापूर – २५, सातारा – ७, सांगली – १, नाशिक – ३६, धुळे – ४१, जळगाव – २०, अहमदनगर – १३, उस्मानाबाद – ९, जालना – २७, लातूर – ६, औरंगाबाद – १६, बीड – १३, परभणी – २, आणि बुलडाणा – ५ या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे आज निकाल लागणार आहेत.
□ श्रीमंतांनो, धान्यावरील हक्क सोडा; अन्यथा फौजदारी; जिल्हा पुरवठा अधिका-यांचा इशारा
सोलापूर – श्रीमंतांनो आपणास मोफत आणि स्वस्त धान्याची आवश्यकता नसल्याने धान्यावरील हक्क सोडा; अन्यथा आपणावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा सोलापूरच्या जिल्हा पुरवठा विभागाने इशारा दिला आहे.
सरकारी नोकरदार, बागायती शेती, खासगी क्षेत्रातील मोठे पगारदार याशिवाय आर्थिक सक्षम असणाऱ्यांनी रेशनवरील स्वस्त धान्याचा हक्क सोडावा. ते धान्य गोरगरीब व वंचितांसाठी उपलब्ध करून देता येईल. यासाठी आर्थिक सक्षम असणाऱ्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपली शिधापत्रिका बदलून ती पांढरी शुभ्र घ्यावी, अन्यथा तपासणीत श्रीमंती आढळली तर अशांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिला.
बुधवारी (ता. 3) स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या बैठकीत लांडगे यांनी धान्यवाटपाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पूर्वी गरीब असलेल्या व आता श्रीमंत झालेल्या शिधापत्रिकाधारकांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी रेशन दुकानदार व पुरवठा निरीक्षकांनाही श्रीमंताची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सूचना देणार असल्याचे सांगितले.
सध्या गरीब व वंचितांना रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी पुरवठा विभागाकडे येत आहेत. यासंदर्भात माहिती घेतली असता रेशन दुकानातून मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर धनदांडगेच डल्ला मारत असल्याचे समजते. अनेक सरकारी नोकरदार, मोठे व्यापारी हे स्वस्त धान्याचे लाभार्थी आहेत. शहरात तर काही नगरसेवकही स्वस्त धान्य मिळविण्यासाठी आग्रही असतात व दप्तरी त्यांची गरीब म्हणूनही नोंद आहे.
परंतु ही मंडळी धान्य घेऊन ते काळ्या बाजारात विकतात तर काही ठिकाणी दुकानदारच त्याची परस्पर विल्हेवाट लावतात. खरेच गरिब व गरजू असणाऱ्यांना धान्य मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. याचा विचार करून आता श्रीमंतांनी धान्यावरील हक्क स्वतःहून सोडावा. यानंतर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून तपासणीत श्रीमंतीच्या बाबी आढळून आल्या तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला सहायक पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुनील पेंटर व अन्य रेशन दुकानदार उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/595976355413431/