सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एकूण 25 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपने मुसंडी मारत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवाला आहे. तर ठाकरे समर्थकाने चार ग्रामपंचायतीवर बाजी मारली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीवर एकहाती सातपैकी सात जागावर विजय मिळवून शिवसेनेची सत्ता आली आहे. या ठिकाणी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना हादरा बसला आहे. Solapur Gram Panchayat Result: BJP Wins 9 Gram Panchayats, Thackeray Wins 4, Congress Defeats
शिवसेना – 4, शिंदे गट – 1, भाजप – 9, राष्ट्रवादी – 4, काँग्रेस – 0 स्थानिक आघाडी – 7 असा 25 ग्रामपंचायतीचा निकाल लागला आहे. काँग्रेसचा गड राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे चित्र आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/596150542062679/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोहाळे ग्रामपंचायतीमध्ये भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराने मोठा विजय मिळवला आहे. त्यांना 9 जागा जिंकण्यात यश आले आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांच्या नेतृत्वाखालील गटाचा विजय झाला आहे. तर समविचारी आघाडीच्या वाट्याला 2 जागा आल्या आहेत. सोहाळे ग्रामपंचायतीमध्ये भीमा परिवाराचा आतापर्यंत सलग 3 वेळा विजय झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात एकूण 25 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपने मुसंडी मारत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवाला आहे. सत्तेत सहभागी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाला केवळ 1 जागावर समाधान मानवं लागलं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी आपला करिष्मा कायम ठेवत 4 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात मिळवल्यात. या निवडणुकात जनतेने 7 ठिकाणी स्थानिक आघाडीकडे आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार हाती दिलाय.
□ असा लागला सोलापूरचा निकाल
करमाळा- 8
1) बिटरगाव वांगी
माजी आमदार नारायण आबा पाटील समर्थक (एकनाथ शिंदे गट)
2) सातोली :
शिवसेना (बागल गट)
3) आवाटी
स्थानिक आघाडी
4) वडशिवणे
बागल गट (शिवसेना)
5) वांगी नबंर १
राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार संजय शिंदे
6) वांगी नं.२
राष्ट्रवादी समर्थक गट
7) वांगी नंबर ३
राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार संजय शिंदे गट
8) भिवरवाडी
शिवसेना (बागल गट)
माढा :- 2
9) म्हैसगाव :राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे गट
10) पडसाळी : स्थानिक आघाडी
बार्शी :- 2
11) वांगरवाडी-तावरवाडी
राऊत गट
12) पानगाव
राऊत गट
मोहोळ – 1
13) सोहाळे
भाजप खासदार धनंजय महाडिक भीमा परिवार
पंढरपूर – 2
14) टाकळी
भाजप समर्थक
15) कोर्टी
स्थानिक आघाडी
माळशिरस :- 1
16) वाघोली : भाजप
मंगळवेढा- 4
17) संत दामाजी नगर : अपक्ष बबनराव अवताडे गट
18) संत चोखामेळा नगर : भाजप आमदार समाधान अवताडे
19) धर्मगाव
स्थानिक आघाडी
20) सलगर खुर्द
स्थानिक आघाडी
दक्षिण सोलापूर – 2
21) मनगोळी
स्थानिक आघाडी
22) चिंचपूर
शिवसेना उद्धव ठाकरे गट
अक्कलकोट – 3
23) वसंतराव नाईकनगर – आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक गट
24) मंगरूळ – आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक गट
25) कबडगाव – आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक गट
https://www.facebook.com/109399567404448/posts/595709082106825/