सोलापूर : आईस मारहाण केल्याची तक्रार स्वतः आईने पोलीस ठाण्यात दिली परंतु हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आईने पोटच्या मुलाला शिक्षा होण्याच्या भीतीने सरकार पक्षाच्या विरोधात साक्ष दिली. तरीही साक्षीदारांनी दिलेली साक्ष व वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर औटी यांनी आईस मारहाण केल्याप्रकरणी मुलास सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. In the beating case, the mother testified against the government party; Still the child is sentenced to forced labor by the Solapur court
या घटनेची हकीकत अशी की,दि.२७ मे २०२० रोजी शारदा माधव परांजपे (वय -७३,रा. राजस्वनगर, विजापूर रोड, सोलापूर) यांना त्यांचाच मुलगा मंगेश परांजपे (रा.राजस्व नगर,सोलापूर) यांनी कु-हाडीने मारहाण करून जखमी केली. आईने विजापूर नाका पोलीसात धाव घेऊन गुन्हा दाखल केला होता.
या गुन्हाचा तपास सपोनि बी.एच.पाटील व पोसई बेंबडे यांनी केला. सपोनि बी.एच.पाटील यांनी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. याप्रकरणी एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले होते. परंतु आरोपीच्या आईने पोटच्या मुलाला शिक्षा होऊन त्यास कारागृहात जावे लागेल या भीतीने आईनै न्यायालयात सरकार पक्षाच्या विरुद्ध साक्ष दिली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/596269572050776/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पीएसआय बेंबडे यांनी फिर्यादी यांची सिव्हील हॉस्पीटल येथे नोंदविलेल्या फिर्यादी जबाबाप्रमाणे साक्ष दरम्यान कथन केले. तसेच आईने उलट साक्ष दिली असली तरी घराशेजारील प्रत्यक्ष घटना पाहणारे साक्षीदाराने सत्य वस्तुस्थिती न्यायालयात कथन केले. त्यामुळे इतर प्रत्यक्ष साक्षीदारांनी दिलेला पुरावा व वैद्यकीय पुराव्याच्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर औटी औटी यांनी आरोपी मंगेश परांजपे यास ६ महिने सक्तमजुरी व २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्याचे तपासकामी पोकॉ.स्वामी व सोनटक्के यांनी मदत केली आहे. यात सरकारी वकील नागनाथ गुंडे यांनी काम पाहिले असून, त्यांना पैरवी अंमलदार म्हणून मपोना.एस.एस.घाडगे यांनी कामकाज केले.
□ शेटफळ येथे शेतात विष पिऊन आत्महत्या
शेटफळ (ता.मोहोळ) येथील भांगे यांच्या शेतात कामाला गेल्यानंतर विष प्राशन केल्याने सचिन बलभीम इंगळे (वय २२ रा. सिध्देवाडी (ता.मोहोळ) हा उपचारादरम्यान मरण पावला. काल गुरुवारी (ता.4) सकाळी हा प्रकार घडल्यानंतर त्याला मोडनिंब येथे प्राथमिक उपचार करून अनिल(भाऊ) यांनी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान तो मरण पावला अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
□ उलट्या झाल्याने विवाहितेचा मृत्यू
रोपळे (ता.माढा) येथे राहणाऱ्या स्वाती संतोष भोंग (वय ३०) यांना उलट्या झाल्याने त्या उपचारा दरम्यान काल गुरुवारी (ता.4) सकाळी मरण पावल्या.२९ जुलै रोजी त्यांना उलट्याची लागण झाली होती. त्यांना कुर्डूवाडी येथे आणि सोलापुरात खाजगी रुग्णालयात उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/596219818722418/