बीड : बीडच्या अंमळनेर येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाभाऊ खाडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहरी गावात एका मंदिराचे बांधकाम पाहण्यासाठी खाडे आले असता त्यांना एका व्यक्तीने घरी येण्याचे निमंत्रण दिले. त्यावेळी महाराजाचे सोने या कुटुंबाने लुटले, अशी फिर्याद महाराजाने पोलीसांत दिली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत महाराजाने बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने दाखल केली. Rape case filed against abbot, brutal beating, treatment in Pune
पीडित महिलेलं आपल्या तक्रारीत, खाडे यांनी संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले असल्याचा आरोप केलाय. लग्न करण्याचं आमीष दाखवून आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोपही पीडितेनं केलेल आहे. गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास खाडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाभाऊ खाडे महाराज यांच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा नोंद झाल्यावर महाराजांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. यात गंभीर जखमी महाराजांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, मारहाण करून साडेतेरा लाख रुपये लुटल्याची तक्रार महाजारांनी यापूर्वी दिली होती. तसा गुन्हा नोंद झाला आहे. खर्डा (ता. जामखेड) पोलिस ठाण्यात दोन्ही गुन्हे नोंद आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/596656305345436/
जामखेड तालुक्यातील मोहरी गावातील घुगे वस्ती येथे महादेव मंदिराचे बांधकाम सुरू आहे. ते पाहण्यासाठी खाडे महाराज २९ जुलैला गेले होते. त्यावेळी बाजीराव गीते यांनी महाराजांना घरी येण्याचे निमंत्रण दिले. पहाटेच्या सुमारास बाजीराव गीते, भिवा गोपाळघरे, अरुण गीते, राहुल संपत गीते, रामा गीते यांनी मारहाण करून अंगावरील १३ लाख ६० हजार रुपयांचे दागिने लुटल्याची फिर्याद महाराजांनी खर्डा पोलिस ठाण्यात दिली.
महाराजांच्या फिर्यादीनुसार बुधवारी (ता. 3) संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. दुसऱ्याच दिवशी गावातील महिलेने महाराजांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची फिर्याद दिली. 12 जुलैला बुवासाहेब खाडे महाराजांनी अत्याचार केल्याचे पीडितीने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर महाराजांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. त्यात महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.
जून 2022 ते जुलै 2022 या काळात बलात्कार करण्यात आला, असा आरोप पीडितेने खाडे यांच्यावर केला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे खाडे यांनीही पोलिस आपल्याला मारहाण झाली असल्याची तक्रार दिली आहे. खाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मारहाण करुन आपल्याकडील सोन्याच्या ऐवज लुटण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यानुसार पाच संशयितांविरोधात खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बुवासाहेब जिजाबा खाडे हे हनुमानगड येथील मठाधिपती म्हणून ओळखले जातात. हनुमानगड हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात येतो. जामखेड इथं खाडे महाराज यांचे अनेक भक्तगण असल्याचंही सांगितलं जातं.
https://www.facebook.com/109399567404448/posts/596655008678899/