□ कथा लिहिली 15 दिवसात पण वाचायला अमिरने लावली दोन वर्षे
पुणे : आमिर खानचा लाल सिंग चड्डा नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. बॉलीवूडचा लाल सिंग चड्ढा चित्रपट हा ऑस्कर विजेत्या फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाची कथा ही सोलापूर सुपूत्र प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. Atul Kulkarni, son of Solapur, wrote the script of Aamir’s ‘Lal Singh Chadha’
अतुल कुलकर्णीने सांगितले की फॉरेस्ट गंपचे रूपांतर २००८ मध्ये आमिर खानच्या प्रॉडक्शनच्या जाने तू या जाने ना’ या चित्रपटाच्या प्रीमियरनंतर सुरू झाले. या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी आम्ही सर्वजण आमिर खानसोबत गेलो होतो. त्याचवेळी आवडत्या चित्रपटाच्या विषयावर चर्चा सुरू झाली.
अतुल कुलकर्णी पुढे म्हणाले की मी आणि आमिरने फॉरेस्ट गंपचे नाव घेतले. यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्याच चित्रपटाची DVD पाहिली. माझ्याकडे मोकळा वेळ असल्याने मी हा चित्रपट पाहिला. या वेळी मला वाटले की जर चित्रपटात दाखवलेले सर्व काही भारतात असेल तर त्याचा काय परिणाम होईल. चित्रपट पाहताना मला वाटले की त्याच्या स्क्रिप्टवर काम का करू नये.
अतुल कुलकर्णी पुढे सांगतात की, मी १० दिवसांत स्क्रिप्ट पूर्ण केली. पण खरी मेहनत सुरू व्हायची होती. स्क्रिप्ट घेऊन तो आमिरकडे घेऊन गेला. आमिरने त्याला स्क्रिप्ट वाचण्यासाठी वेळ दिला नाही. अतुल कुलकर्णीने सांगितले की, आमिर खानने पहिली दोन वर्षे स्क्रिप्टही वाचली नाही. दोन्ही कलाकार एकमेकांच्या संपर्कातही होते. आमिर नेहमी म्हणायचा हो, वाचूयात.’
https://www.facebook.com/109399567404448/posts/597439291933804/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/597465435264523/
काही वर्षांनंतर अतुल कुलकर्णीने अभिनेता आमिर खानला विचारले की तो स्क्रिप्ट कधी वाचणार. यानंतर आमिर अतुलला म्हणाला- तू लेखक नाहीस आणि तू मला सांगतो की तू १५ दिवसांत फॉरेस्ट गंपची स्क्रिप्ट लिहिली आहेस. तू माझा जवळचा मित्र आहेस आणि तू खूप वाईट लिहिलं आहेस असं सांगून मी तुला निराश करू इच्छित नाही.’ म्हणून मी स्क्रिप्ट ऐकत नव्हतो. मात्र, अतुलने आमिरला हे सांगून स्क्रिप्ट वाचायला लावली की वाचल्यानंतर त्याला आवडली नाही तर त्याने फेकून दिली तरी चालेल.
अतुल कुलकर्णी म्हणाले, “तू कथा वाचून फेकून दिलीस तरी चालेल. असे म्हणत मी आमिरला ती कथा वाचण्यास भाग पाडले. त्यानंतर आमिरला कथा इतकी आवडली की त्याने केवळ अभिनयच नव्हे तर चित्रपटाची निर्मिती देखील करण्याचा निर्णय घेतला.” पण त्यांनतर पुढील काही वर्षे पॅरामाउंट पिक्चर्सकडून ‘फॉरेस्ट गंप’चे राईट्स मिळवण्यात गेले. मूळ राईट्ससाठी पॅरामाउंटशीही संपर्क साधण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी १० वर्षे लागली.” यासाठी खरोखर खूप वेळ लागल्याचे त्यांनी सांगितले.
आता अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील आमिर खानच्या लूकची विशेष चर्चा होत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
□ आमिरच्या लाल सिंग चढावर 3 राज्यात बंदी, KRK चा दावा
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लाल सिंह चड्ढा’ हा ट्रेंड चर्चेत आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे.
अभिनेता आमिर खानला हिंदुत्वविरोधी ठरवत त्याचा चित्रपट ‘लाल सिंग चढ्ढा’ला बॉयकॉट करण्याचे आवाहन होत आहे. अशातच अभिनेता कमाल आर खानने एक दावा केला आहे. लाल सिंग चढावर तीन राज्यांमध्ये बंदी घालण्यात आल्याचा दावा केला. केआरके त्या ट्विटमध्ये म्हणतो की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा यांच्यासहित आणखी काही राज्यांमध्ये लाल चड्ढा सिंगवर बंदी घालण्यात आली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/597496655261401/