Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर : शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Solapur: Unfortunate death of a three-year-old girl after falling into a ditch, MPDA stationed

Surajya Digital by Surajya Digital
August 7, 2022
in Hot News, सोलापूर
0
सोलापूर : शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर :  सोलापुरात शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथे ही घटना घडली आहे. घराशेजारी असलेल्या शेतात शोषखड्डा खोदण्यात आला होता. त्यात राजेश्वरी बुडाली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण भोगाववर शोककळा पसरली आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. Solapur: Unfortunate death of a three-year-old girl after falling into a death, MPDA stationed

 

मार्डी शेजारच्या शेतातील शोषखड्डयात पडून एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश्वरी सूर्यकांत घोडके (वय 3)असे त्या चिमुकलीचे नाव आहे. घोडके कुटुंबीय भोगाव येथे आपल्या शेतात राहतात. आई-वडील दोघेही शेती करतात. त्यांना एक तीन वर्षांची व दुसरी पाच वर्षांची अशा मुली आहेत.

मयत चिमुकली मार्डी येथील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेत जात होत्या. शनिवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळी राजेश्वरी घराबाहेर खेळायला निघून गेली. तिची आई घरकामामध्ये गुंतलेली होती. शिवाय ती नेहमी बहिणीसोबत खेळत बाहेर असल्यामुळे काही वेळ कोणीच लक्ष दिले नाही.

 

अकरा वाजून गेल्यानंतरही ती घरी आली नाही आणि घराजवळ दिसत नसल्याने सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेच मिळून आली नाही. तिचे आई-वडील, आजी व शेजारचे सर्वच लोक तिचा शोध घेत होते.

 

घराशेजारी असलेल्या शोषखड्डयात तरी पडली की काय म्हणून पाहायला गेले. तेव्हा त्या ठिकाणी चिखलात लहान मुलाच्या पाऊलखुणा दिसल्या. खड्ड्यातील पाण्यात शोधल्यानंतर तिचा मृतदेहच सापडला. सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत तालुका पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ नान्नज येथील गुन्हेगार विजय कोरे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

सोलापूर – तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजय सुभाष कोरे (वय ४२ रा. नान्नज ता.उत्तर सोलापूर)या सराईत गुन्हेगाराला ग्रामीणच्या पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी येरवडा कारागृहाकडे करण्यात आली.

विजय कोरे याच्या विरुद्ध शरिर आणि मालाविषयी मागील पाच वर्षात दखलपात्र ८ तर अदखलपात्र स्वरूपाचे ५ असे १३ गुन्हे दाखल आहेत. तो अनेक वर्षांपासून आर्थिक फायदा आणि दहशत निर्माण करण्यासाठी नागरीकांशी गुन्हेगारी वर्तन करत होता. त्याच्या विरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे तसेच सदरबझार पोलीस ठाणे येथे धार्मिक भावना दुखवुन दोन समाजात तेढ निर्माण करणे, जबरीने मालमत्ता घेणेकरीता इच्छापुर्वक दुखापत करणे, लोकांची फसवणुक करणे, महिलांची छेडछाड करणे, दगड फेकुन मारणे, रस्ता अडवुन वाहनाचे नुकसान करणे, न्यायालयीन कर्मचारी (बेलीफ) यांना दमदाटी करून धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

 

विजय कोरे याच्यावर यापुर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. तरी देखिल त्याच्या गुन्हेगारी वृत्तीत बदल झाला नव्हता.त्यामुळे त्याच्यावर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, हिंमत जाधव (अपर अधीक्षक) यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अमोल भारती, सत्यसाई कार्तीक (भा.पो.से.),गुन्हे शाखेचे निरीक्षक सुहास जगताप, निरिक्षक नामदेव शिंदे, सहा. निरिक्षक नेताजी बंडगर, पो.ना.अनिस शेख,अमोल गावडे, स.फौ. विवेक सांजेकर, पो.ना. स्वामीराव जाधव, शशि कोळेकर, पोकॉ खवतोडे, सोलंकर यांनी बजावली आहे.

 

 

Tags: #Solapur #Unfortunate #death #three-year-old #girl #falling #death #MPDA #stationed#सोलापूर #शोषखड्ड्यात #पडून #तीनवर्ष #चिमुकली #दुर्दैवी #मृत्यू #एमपीडीए #स्थानबद्ध
Previous Post

तडीपार आरोपीस अटक; चौपाडमधील मोबाईल दुकान फोडून कोयत्याने केला हल्ला

Next Post

सोलापूरचे सुपुत्र अतुल कुलकर्णींनी लिहिली आमिरच्या ‘लाल सिंग चड्डा’ची स्क्रिप्ट

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूरचे सुपुत्र अतुल कुलकर्णींनी लिहिली आमिरच्या ‘लाल सिंग चड्डा’ची स्क्रिप्ट

सोलापूरचे सुपुत्र अतुल कुलकर्णींनी लिहिली आमिरच्या 'लाल सिंग चड्डा'ची स्क्रिप्ट

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697