सोलापूर – दुचाकी वरून जाताना कॅनॉलच्या पुलाला धडकून तीस फूट खोल पाण्यात पडल्याने दुचाकी चालत गंभीर जखमी होऊन मरण पावला. ही घटना भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील कॅनॉल जवळ आज रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. Solapur: A young bike rider died after falling into a canal in North Solapur
स्वप्निल सिद्धेश्वर कांबळे (वय २३ रा. राहुल सोसायटी,सिरत नगर, होटगी रोड) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मध्यरात्रीनंतर आपल्या दुचाकीवरून नान्नज रोडवरून सोलापूर कडे निघाला होता. भोगाव येथील कॅनॉलच्या पुलाला दुचाकी धडकल्याने तो पाण्यात पडला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली. हवालदार इंगळे पुढील तपास करीत आहेत.
□ सोलापूर : एनटीपीसीत अधिकाऱ्याला लाच घेताना सीबीआयने केली अटक
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि केंद्र शासनाच्या मालकीची असणारी जिल्ह्यातील एकमेव कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनटीपीसीमधील यूपीएल कंपनीतील सुरक्षा अधिकाऱ्याला कंत्राटदार, पुरवठादार आणि कामगारांकडून पैसे खाण्याची गोडी लागली होती. पैसे घेतल्याशिवाय तो कामच करत नव्हता. त्यामुळे वैतागलेल्या एका कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने शनिवारी दुपारी एनटीपीसी कंपनीच्या आवारात छापा टाकून संबंधित लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गोविंद कुमार असे सीबीआयने ताब्यात घेतलेल्या एनटीपीसीमधील अधिकाऱ्याचे नाव असून तो एनटीपीसी अंतर्गत असणाऱ्या युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड नावाच्या कपनीकडे सेफ्टी ऑफिसर (सुरक्षा (अधिकारी) म्हणून कार्यरत आहे. ही कंपनी ठेकेदार नेमणे, काट देगो आदी कामे करने, या कामांची जबाबदारी गोविंद कुमार याच्याकडे होती.
तो कंत्राट देण्यासाठी, कंत्राटदारांची बिले काढण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याला वैतागून एका कंत्राटदाराने थेट सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/597756578568742/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापुरातील एका कंत्राटदाराने यूपीएल कंपनीकडे पाच लाख रुपये सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉझिट) म्हणून ठेवले होते. ती रक्कम परत मिळवण्यासाठी त्याने कंपनीकडे रीतसर मागणी केली होती. ही रक्कम देण्यासाठी गोविंद कुमार संबंधित कंत्राटदाराकडे अडीच लाख रुपयांची मागणी करत होता. सुरुवातीला कंत्राटदाराने गोविंद कुमारला अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.
दरम्यान, गोविंद कुमार यास अडीच लाख रुपये देण्याची संबंधित कंत्राटदाराची इच्छा नव्हती. म्हणून त्याने पुण्यातील सीबीआयचे कार्यालय गाठले. त्याठिकाणी रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी एनटीपीसी परिसरात सापळा लावण्यात आला. एनटीपीसीमध्ये असलेल्या आयटीआयच्या बाहेर संबंधित कंत्राटदाराला त्याने पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी दीड वाजता गोविंद कुमार आयटीआयपासून बाहेर रस्त्यावर आला. त्याठिकाणी एक लाख रुपयांची रोकड स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्याला ताब्यात घेतले.
गोविंद कुमार यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी त्याला पुणे महामार्गावरील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात हलवण्यात आले आहे. त्याठिकाणी सीबीआयचे पथक रात्रीपर्यंत त्याची चौकशी करत होते. मात्र चौकशीतील कोणताही तपशील समजू शकला नाही. दरम्यान रात्री गोविंद कुमार याची रवानगी जेलरोडच्या लॉकअपमध्ये करण्यात आली.
● सोलापूर : शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी
सोलापूर : मृत्यू सोलापुरात शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथे ही घटना घडली आहे. घराशेजारी असलेल्या शेतात शोषखड्डा खोदण्यात आला होता. त्यात राजेश्वरी बुडाली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण भोगाववर शोककळा पसरली आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली.
मार्डी शेजारच्या शेतातील शोषखड्डयात पडून एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश्वरी सूर्यकांत घोडके (वय 3)असे त्या चिमुकलीचे नाव आहे. घोडके कुटुंबीय भोगाव येथे आपल्या शेतात राहतात. आई-वडील दोघेही शेती करतात. त्यांना एक तीन वर्षांची व दुसरी पाच वर्षांची अशा मुली आहेत.
मयत चिमुकली मार्डी येथील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेत जात होत्या. शनिवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळी राजेश्वरी घराबाहेर खेळायला निघून गेली. तिची आई घरकामामध्ये गुंतलेली होती. शिवाय ती नेहमी बहिणीसोबत खेळत बाहेर असल्यामुळे काही वेळ कोणीच लक्ष दिले नाही.
अकरा वाजून गेल्यानंतरही ती घरी आली नाही आणि घराजवळ दिसत नसल्याने सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेच मिळून आली नाही. तिचे आई-वडील, आजी व शेजारचे सर्वच लोक तिचा शोध घेत होते.
घराशेजारी असलेल्या शोषखड्डयात तरी पडली की काय म्हणून पाहायला गेले. तेव्हा त्या ठिकाणी चिखलात लहान मुलाच्या पाऊलखुणा दिसल्या. खड्ड्यातील पाण्यात शोधल्यानंतर तिचा मृतदेहच सापडला. सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत तालुका पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/597753745235692/