पंढरपूर – तालुक्यातील तावशी येथे सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजाचा चेंडू गुप्तांगाला लागल्याने नेपतगाव येथील खेळाडूचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. Pandharpur: Playing cricket without guards leads to death, youth dies after being hit in the groin by a ball
क्रिकेट खेळताना गार्डस डोक्याचे हेल्मेट आदी सुरक्षेची साहित्य घालणे गरजेचे आहे. ही खबरदारी न घेतल्याने एका तरूण युवकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये तालुक्यातील नेपतगाव येथील विक्रम रमेश क्षीरसागर (वय-३५) या खेळाडुचा मृत्यू झाला. तावशी येथे टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नेपतगाव संघाकडून विक्रम फलंदाजी करीत होता. विरोधी संघातील खेळाडूने वेगाने टाकलेला टेनिस चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला.
यावेळी त्याने गार्ड घातले नसल्याने जोरदार मुका मार लागून तो जागीच कोसळला. यावेळी त्यास उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाचा त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान विक्रम हा नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथेच वास्तव्यास होता. परंतु लॉकडाऊननंतर तो आपल्या मुळ गावी नेपतगावला आला होता. क्रिकेट खेळाची त्याला सुरूवातीपासून आवड असल्याने तो नेहमी विविध स्पर्धेत भाग घेत असे.
विक्रमच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार व अडीच वर्षाची दोन मुल आहेत. ग्रामीण भागात तसेच विविध ठिकाणी अशा अनेक क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. परंतु यासाठी आवश्यक सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/597767178567682/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/597550388589361/
□ शांती नगर येथे वीट भट्टी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – नई जिंदगी परिसरातील शांतीनगर येथे राहणाऱ्या मलकारी दत्ता कोळी (वय ३०) या विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्याने राहत्या घरातील खिडकीला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.त्याला फासातून सोडवून महादेव कोळी (भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तो उचारापूर्वीच मयत झाला. मयत मलकारी कोळी हा कामती वाघोली येथील वीट भट्टीवर कामाला होता. त्याची पत्नी दोन दिवसांपूर्वी कर्नाटक येथे माहेरी गेली होती. घरात एकटाच असताना त्याने हा प्रकार केला. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.
□ तळेहिप्परगा येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – तळे हिप्परगा परिसरातील मंठाळकर वस्तीत राहणाऱ्या अजय शिवाजी चौगुले (वय २४) या विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
काल शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह छताच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत अजय चौगुले हा जेसीबी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. त्याची पत्नी दोन महिन्यापूर्वी माहेरी गेली होती. घरात कोणी नसताना त्यांनी हा प्रकार केला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून हवालदार गुंड पुढील तपास करीत आहेत.
□ हात पाय धुताना तलावात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू
सोलापूर-मित्रासोबत फिरायला गेल्यानंतर तलावात हात पाय धुताना पाण्यात बुडाल्याने १९ वर्षीय तरुण मरण पावला. ही घटना तळेहिप्परगा (ता.उत्तर सोलापूर) येथे आज रविवारी (ता.७) दुपारच्या सुमारास घडली.
दिनेश लिंबाजी खार्वे (वय १९ रा.कुमठा नाका,सोलापूर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आज मित्रांसोबत हिप्परगा तलाव येते फिरायला गेला होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास तो काठावर बसून तो हात पाय धुत होता. त्यावेळी अचानक पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला. शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह सायंकाळच्या सुमारास आढळून आला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. मयत दिनेश खार्वे हा शिक्षण घेत होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.