Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

बिहारमध्ये नवीन सरकार ! मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली शपथ

Surajya Digital by Surajya Digital
August 10, 2022
in Hot News, देश - विदेश, राजकारण
0
बिहारमध्ये नवीन सरकार ! मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली शपथ
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : जेडीयू नेते नितीश कुमार यांनी भाजपासोबत युती तोडून राजदसोबत आघाडी केली आहे. त्यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आठव्यांदा शपथ घेतली आहे. त्यांना राज्यपाल फागू चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तर दुसरीकडे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. New government in Bihar! Nitish Kumar took oath as Chief Minister for the eighth time Tejashwi Yadav Deputy Chief Minister

 

तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आपल्यासोबत 160 आमदार असल्याचा दावा आघाडीने केला आहे.

बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि राजदप्रणित महागठबंधन यांचं संयुक्त सरकार स्थापन झालं. यावेळी नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

भाजपची साथ सोडून नितीश कुमार यांनी महागठबंधनसोबत नवं सरकार स्थापन केलं आहे. बिहारच्या राजभवनात हा शपथविधी सोहळा आज बुधवारी पार पडला. राजभवन येथील या शपथविधी सोहळ्याला लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्य तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी तसेच राजदचे नेते तेज प्रताप यादव हे देखील उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, भाजप सोडण्याचा निर्णय पक्षानं एकत्रितपणे घेतला. सन २०२४ पर्यंत पदावर राहिल किंवा नाही हे सांगू शकत नाही. त्यांना काय बोलायचंय ते बोलू शकतात. पण मी सन २०१४ मध्येच अद्याप राहू शकत नाही. तेजस्वी यादव यांच्या कुटुंबियांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तर तेजस्वी यादव म्हणाले, बिहार माझं कुटुंब आहे. मी सर्वांचे आभार मानते असं तेजस्वी यांच्या पत्नीनं म्हटलं तर बिहारसाठी ही चांगली गोष्ट घडली. मी सर्वांचे आभार मानते असं तेजस्वी यांच्या आई राबडीदेवी यांनी म्हटलं आहे. आम्ही काम करण्यासाठी सत्तेत आलो आहोत, असं तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे.

 

 

□ ‘नितीश कुमार ज्या मार्गावर चालले, त्याला उध्दव मार्ग म्हणतात’

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा धक्का देत भाजपपासून युती तोडली आहे. नितीश कुमार हे लालू यादव यांचा राजद, काँग्रेस यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत आहेत. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत नितीशकुमार उद्धव ठाकरेंच्या मार्गावर चालल्याचे म्हटले आहे. ‘नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात’, असे वाघ यांनी म्हटले,

 

Tags: #New #government #Bihar! #NitishKumar #took #oath #ChiefMinister #eighthtime #TejashwiYadav #Deputy #ChiefMinister#बिहार #नवीन #सरकार #मुख्यमंत्री #नितीशकुमार #आठव्यांदा #शपथ #तेजस्वीयादव #उपमुख्यमंत्रिपद
Previous Post

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शहराध्यक्षपदी कटारे, सचिवपदी लांबतुरे

Next Post

जयंती, सण, उत्सव, निवडणूक पाहता तिघांना सोलापूर शहर – जिल्ह्यातून केले तडीपार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
जयंती, सण, उत्सव, निवडणूक पाहता तिघांना सोलापूर शहर – जिल्ह्यातून केले तडीपार

जयंती, सण, उत्सव, निवडणूक पाहता तिघांना सोलापूर शहर - जिल्ह्यातून केले तडीपार

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697