मुंबई : संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी, भाजपा महाराष्ट्रात एक नंबर बनवण्यासाठी माझी नियुक्ती झाली आहे, माझी निवड कार्यकर्ता म्हणून झाली, राज्यातील घराघरात भाजपा पोहचवणार असा निर्धार भाजपाने नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. Chandrashekhar Bawankule as the new state president of BJP and Ashish Shelar as the new president of Mumbai
चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री झाल्याने त्यांच्याजागी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर बावनकुळे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली आहे.
प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच चंद्रशेखर बावनुकळे यांनी मिशन 200 आणि 45 चा नारा दिला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकण्याचे आणि लोकसभा निवडणुकीत 45 जागा जिंकण्याचे आमचे मिशन आहे. ते मिशन आम्ही पूर्ण करणारच, अशी घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. मला गावच्या अध्यक्षपदापासून ते विविध जबाबदाऱ्या दिल्या. त्या सर्व मी पार पाडल्या आहेत. या पुढेही कोणतीही जबाबदारी पार पाडणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तर आमदार आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं आहे. या दोन्ही नियुक्त्या तत्काळ प्रभावानं लागू करण्यात आल्या आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने श्री चन्द्रशेखर बावनकुले, सदस्य विधान परिषद को भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र का प्रदेश अध्यक्ष और श्री आशीष शेलार, विधायक को मुम्बई महानगर भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष नियुक्त किया है। pic.twitter.com/AXLSVc1q0o
— BJP (@BJP4India) August 12, 2022
अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. तर मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसं पत्रकही जारी करण्यात आलं आहे. बावनकुळे हे ओबीसी नेते आहेत. तर शेलार हे मराठा समाजातून येतात. त्यामुळे भाजपने मराठा आणि ओबीसी नेत्यांना महत्त्वाचे पद देऊन जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा भाजपला येत्या काळात होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आशिष शेलार यांची दुसऱ्यांदा मुंबईच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांचं पद रिक्त होतं. त्यामुळे शेलार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच शेलार यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. शेलार हे अजातशत्रू आहेत. सर्वच पक्षात त्यांचे राजकीय लागेबांधे आहेत. शिवाय ते आक्रमक नेतेही आहेत. अभ्यासू नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा महापालिका निवडणुकीत होणार असल्याने त्यांच्याकडे मुंबईची सूत्रे दिली असल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि राम शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. दोन्ही नेते ओबीसी असल्याने ही उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली होती. मात्र, बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात फडणवीस यांच्याप्रमाणेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही मोठा हात असल्याची माहिती आहे.