सोलापूर – वैद्यकीय बिलापोटी रूग्णास रूग्णालयात डांबून ठेवण्याचा संतप्त प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. रूग्णाने स्वतःचा व्हिडिओ काढून व्हायरल केल्याने या प्रकरणास वाचा फुटली, अन्यथा रूग्णास पैश्याअभावी आणखी किती दिवस रूग्णालयात खितपत पडावे लागले असते, याचा विचार करवत नाही. In Solapur, a hospital kept a patient on hold for a month due to medical bills
महेंद्र गायकवाड या पैठण येथील रुग्णास सोलापुरातील आधार सुपर स्पेशलिटी या रुग्णालयात महिनाभरापासून डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. जवळपास १० लाख रुपयांचे बिल न भरल्याने हॉस्पिटल प्रशासनाने असे कृत्य केले होते. संबंधित रुग्णांने बाथरूममध्ये जाऊन मोबाईल वर व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडीओ वाऱ्यासारखं सोशल मीडियावर वायरल झाला आणि थेट मुख्यमंत्री कार्यालयातपर्यंत जाऊन पोहोचला.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी सोलापुरातील मनीष काळजे यांना माहिती दिली आणि तत्काळ महेंद्र गायकवाड या रुग्णाची सुटका करावी, असे सांगितले. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता मनीष काळजे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन हॉस्पिटल प्रशासनास जाब विचारला आणि डिस्चार्ज झालेल्या रुग्णास असे वेठीस धरता येत नाही असे सांगितले. याबाबत स्थानिक प्रशासनास तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रुग्णाचा सोलापूर-पुणे महार्गावर अपघात झाला होता. जून महिन्यात महेंद्र गायकवाड यांचे सोलापूर पुणे महार्गावर अपघात झाला होता. तेव्हा त्यांना सोलापुरातील आधार सुपर स्पेशलिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर होती. त्यावर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. जून महिन्यापासून आजतागायत महेंद्र गायकवाड हे आधार हॉस्पिटलमध्येच होते.
सोशल मीडियावर रुग्णाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. महेंद्र गायकवाड याने एक व्हिडिओ तयार केला. हॉस्पिटलने मला वेठीस धरले आहे, हॉस्पिटलचे बिल भरून माझे घरदार विकले आहे. आता आणखीन बिल भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, मी आत्महत्या करणार, असा व्हिडीओ सोशल मीडियावर त्याने अपलोड केला होता. हा व्हिडीओ मुंबई ,पुणे ,औरंगाबाद आदी शहरात व्हायरल झाला होता आणि थेट मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला.
सोलापुरातील एकनाथ शिंदे समर्थक मनीष काळजे यांनी हा व्हिडीओ पहिला आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांसोबत चर्चा केली. आपल्या समर्थकांसह सोलापुरातील आधार हॉस्पिटल गाठले. रुग्णाची तब्येतीबाबत विचारपूस करत , डिस्चार्ज तारीख विचारून घेतली. रुग्णालयाने देखील अडमुठ्या भाषेत उत्तर देत, बिल भरा आणि घेऊन जा असे सांगितले. यावरून काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. महिनाभर रुग्णास डांबून ठेवले, वेठीस धरले , असे करणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तुम्ही प्रशासनाकडे दाद मागा, असे सांगत त्यांनी शेवटी रुग्णाची सुटका केली.