सोलापूर : सोलापुरात पोलीसाच्या दैनंदिन जीवनात एक दुःखद घटना घडलीय. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी एका हवालदार मृत्यु झाला आहे. या घटनेने पोलीस प्रशासनातून हळहळ व्यक्त होत आहे. Solapur: The unfortunate death of a police constable on the second day of his birthday
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस हवालदार अशोक लोखंडे (वय-५०) यांचे आज शुक्रवारी (दि.१९ ऑगस्ट) सकाळी अकस्मिक निधन झाले. अशोक नागनाथ लोखंडे हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार अशा पदावर कर्तव्य बजावले होते.
सध्या आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत होते. काल गुरूवारी त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्या शुभेच्छाला उत्तर देत आणि आभार मानत ते आणि त्यांचे कुटुंब आनंदात असतानाच आज शुक्रवारची सकाळ त्यांच्यासाठी दुर्देवी ठरली.
आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांना छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी तातडीने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच अवघ्या काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र माने, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जावून लोखंडे परिवाराचे सांत्वन केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी लोखंडे कुटुंबावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. पोलीस हवालदार अशोक लोखंडे यांनी अनेक चांगल्या कामगिरी पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे त्यांना पुरस्कार, बक्षिसही मिळाले होते. तत्कालीन पोलीस आयुक्तांकडून त्यांचा सत्कारही झाला होता. अशोक लोखंडे प्रत्येकाला भेटल्यानंतर आनंदाने हसत बोलायचे. त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला असून पोलीस आयुक्तालयात ही घटना समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
□ घरात घुसून विवाहितेचा विनयभंग एकावर गुन्हा
सोलापूर – आदल्या दिवशी झालेल्या भांडणाची पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून घरात घुसून मारहाण करीत एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना अकलूज येथे १६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली.
या प्रकरणात अकलूजच्या पोलिसांनी अविनाश सुहास गायकवाड (रा.इंदिरानगर घरकुल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अविनाश गायकवाड हा मंगळवारी (ता.16) दुपारी अकलूज परिसरातीत तक्रार देणाऱ्या महिलेच्या घराजवळ आला आणि एका तरुणास कोयत्याने मारहाण केली.
घरातील एका विवाहितेशी असभ्य वर्तन केले. तिचा पती भांडण सोडविण्यास आले असता त्याला देखील अविनाश गायकवाड यांनी ठार मारण्याची धमकी दिली. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार शेख पुढील तपास करीत आहेत .