मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. विधिमंडळात त्यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्याची माहिती दिली. या बरोबरच या दर्जाने गोविंदांना नोकरीमध्ये देखील 5% आरक्षण मिळणार असून, दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. Big gift to Govinda: Reservation in government service and protection of 10 lakhs Chief Minister Eknath Shinde
मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित केल्यानंतर, हे निर्णय मोठे दिलासादायक आहेत. प्रो कबड्डी सारखी प्रो दहीहंडी लीग देखील आता सुरू होणार असल्याने, गोविंदांना स्वतःचे करिअर घडविण्याच्या देखील संधी मिळणार
आहेत.
दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आर्थिक साहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यानुसार गोविंदाचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास १० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येईल. तसेच ५ टक्के आरक्षणाचा लाभही गोविंदांना मिळणार आहे, अशी घोषणा यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनादरम्यान केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुंबईत आज सकाळपासून दहीहंडीला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबईत सगळीकडे दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. मात्र मुंबईत या सणाला लागबोट लागले आहे. मुंबईत आतापर्यंत 12 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 7 जणांवर पालिकेत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं.
यात काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिहंडीचा आता क्रीडा प्रकारात समावेश करण्याची घोषणा काल गुरुवारी विधानसभेत केली. त्यासाठी पुढील अटी शर्ती आवश्यक आहेत.
□ अटी आणि शर्ती
– दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे.
– मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तत्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे अहवाल देणे आवश्यक आहे.
– मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तत्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या साहाय्याने करणे गरजेचे आहे.
– गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून १८ वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक साहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.
– मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक साहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.
– गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे.
– न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे.
□ राज्यभर आज दहीहंडीचा उत्साह; भाजपकडून मुंबईत 370 ठिकाणी दहीहंडी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षांपासून राज्यात गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा सण साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा राज्यभरात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये खासकरून मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यात पोलीसांच्या नियमामुळे रात्री 10 वाजेपर्यंत दहीहंडीचा जल्लोष करता येणार आहे.
दहीहंडी हा जसा धार्मिक सण आहे तसाच तो राजकीय सुद्धा आहे. उद्या मुंबई आणि ठाण्यात अनेक राजकीय पक्षाकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकट्या भाजप पक्षाकडून तब्बल 370 ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळीत आशिष शेलार यांनी दहीहंडी आयोजित केली आहे.