Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

टुडेज ब्लॉग : ‘अमृतकाळा’तील भाजपची वाटचाल

Today's blog: BJP's move in 'Amritkala' politics

Surajya Digital by Surajya Digital
August 19, 2022
in Hot News, ब्लॉग, राजकारण
0
टुडेज ब्लॉग : ‘अमृतकाळा’तील भाजपची वाटचाल
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभेत ३०३ जागांसह भाजप सर्वांत बलाढ्य पक्ष वाटत असला तरी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पार खिळखिळी झाली आहे. सत्तेच्या अमृतकाळात प्रवेश करताना बड्या मित्रपक्षांशिवाय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपपुढचे आव्हान वाटते तेवढे सोपे नाही. Today’s blog: BJP’s move in ‘Amritkala’ politics

 

स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना देशाला आतापर्यंत ४९ मुख्यमंत्री देणाऱ्या भाजपला बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि काँग्रेसला खिंडार पाडून पन्नासावा मुख्यमंत्री देता आला असता. त्यापूर्वी, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदी बसवून भाजपला महाराष्ट्रातही ती संधी साधता आली असती. पण कदाचित मोदी-शहांनी हा मान गुजरातसाठी राखून ठेवला असावा.

आज अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचलप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या डझनभर राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यापैकी अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हिमाचलप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या दहा राज्यांमध्येच भाजपला पूर्ण बहुमत आहे. आसाम आणि हरियाणामध्ये मित्रपक्षांच्या समर्थनाने भाजप सत्तेत आहे.

कर्नाटक आणि मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यावर विरोधकांची सरकारे पाडून भाजपने सत्ता मिळविली
आहे; तर गोवा आणि गुजरातमध्ये काठावरचे अपुरे बहुमत कुचकामी ठरल्यामुळे संख्याबळ वाढविण्यासाठी काँग्रेसचे आमदार फोडावे लागले आहेत.

थोडक्यात, राज्यांच्या विधानसभांमध्ये मोदी आणि शहांच्या नेतृत्वाखालील सर्वशक्तिमान भाजपचे देशातील २८ पैकी दहा राज्यांवरच निर्विवाद वर्चस्व आहे. तुलनेने पंतप्रधान मोदींच्या करिश्म्यामुळे लोकसभेत भाजपची स्थिती खूपच चांगली आहे. उत्तरप्रदेश (८० पैकी ६४), गुजरात (२६ पैकी २६), राजस्थान (२५ पैकी २५), हरियाणा (१० पैकी १०), दिल्ली (७ पैकी ७), उत्तराखंड (५ पैकी ५), हिमाचलप्रदेश (४पैकी ४), मध्य प्रदेश (२९ पैकी २८), कर्नाटक (२८ पैकी २५), छत्तीसगढ (११ पैकी ९), झारखंड (१४ पैकी ११), आसाम (१४ पैकी १०) आणि पश्चिम बंगाल (४२ पैकी १८) अशा नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर भाजपने लोकसभेत तीनशेचा विक्रमी आकडा पार केला होता.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

पण गेल्या तीन वर्षांत राजकीय परिस्थिती बदलली आहे. ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग, एनआयए आदी केंद्रीय तपास यंत्रणाची दहशत केवळ संधीसाधूपणाचे राजकारण करणाऱ्यांवरच राहिली आहे.

 

भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार या चार राज्यांमध्ये शिवसेना आणि संयुक्त जनता दलाच्या मदतीने २१० पैकी १६४ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपचा स्वतःचा वाटा होता ११९ जागांचा. उत्तरप्रदेश वगळता गेल्या तीन वर्षांत भाजपची महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या राजकारणावरील पकड निसटली आहे.

 

सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात अपना दल वगळता युती करण्यालायक मित्रपक्ष उरलेला नाही. महाराष्ट्रात कमकुवत महाविकास आघाडीही भाजपसाठी त्रासदायक ठरणार आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, काँग्रेस आणि डाव्यांच्या ‘महागठबंधन’ पुढे भाजपची डाळ शिजणार नाही. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या १८ जागा जिंकण्याची पुनरावृत्ती करणे अवघड आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावतींना गप्प बसवूनही सदैव निवांत असलेल्या अखिलेश यादव यांनी दिलेली टक्कर भाजपची झोप उडविणारी ठरली.

या चार राज्यांमध्ये भाजपचे संख्याबळ घटले तर त्याची भरपाई अन्य राज्यांतून होण्याची शक्यता नाही. कर्नाटकात २५ आणि तेलंगणात ४ अशा लोकसभेच्या २९ जागा जिंकणारा भाजप लोकसभेच्या एकूण १३२ जागा असलेल्या दक्षिणेतील तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, पुदुच्चेरी, लक्षद्वीप, अंदमान निकोबारमध्ये शून्य आहे. सत्तेच्या अमृतकाळात प्रवेश करताना बड्या मित्रपक्षांशिवाय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपपुढचे आव्हान वाटते तेवढे सोपे नाही.

📝 📝 📝

¤ सुनील चावके

 

Tags: #Today's #blog #BJP's #move #Amritkala #politics #narendramodi#टुडेज #ब्लॉग #अमृतकाळ #भाजप #वाटचाल #राजकारण
Previous Post

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सोडली पुडी, राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांमागे लागणार ईडी 

Next Post

गोविंदांना मोठी भेट : शासकीय सेवेत आरक्षण आणि दहा लाखांचे संरक्षण

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
गोविंदांना मोठी भेट : शासकीय सेवेत आरक्षण आणि दहा लाखांचे संरक्षण

गोविंदांना मोठी भेट : शासकीय सेवेत आरक्षण आणि दहा लाखांचे संरक्षण

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697