पंढरपूर : आधी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या. त्यानंतर आ. मोहित कंबोज भाजपशिवाय इतर पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात सर्वात पुढे होते. आता माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही यामध्ये उडी घेतली असून त्यांनी राष्ट्रवादीच्या मागे लवकरच ईडी लागणार असून दहापैकी पाच नेत्यांच्या हातात बेडी पडणार असल्याची पुडी गुरुवारी माढा दौऱ्यादरम्यान टेंभुर्णी येथे सोडली आहे. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादीसह सर्वच पक्षामध्ये ते पाच नेते कोण ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम सुरू झाले आहे. MP Ranjitsinh Naik Nimbalkar leaves Pudi, ED politics will follow five leaders of NCP
राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांची लवकरच ईडी कडून चौकशी होणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामध्ये माजी मंत्री आणि आमदारांची नावे केंद्रीय तपास यंत्रणेकडे पाठवली आहेत. लावकच त्यांच्यावर कारवाई करण्यात होईल, असे खासदार निंबाळकर यांनी संगितले.
लवासा आणि जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी एका बड्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा यामध्ये समावेश असल्याचा दावा ही खासदार निंबाळकर यांनी केला आहे. मोहित कंबोज यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करून खळबळ उडाली दिली होती. आता खासदार निंबाळकर यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अशातच भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी अजित पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या दहा पैकी पाच नेत्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे पाच बडे नेते कोण याविषयी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये अनेक चोर आहेत त्यातील कोणता चोर नेता आहे हे देखील लवकरच समोर येणार आहे.
लवासा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बारा वर्षानंतर समन्स बजावले आहे. यामध्ये सरकारने कारवाई करण्याचे धोरण ठरवले असेल तर यातून मोठा घोटाळा बाहेर येईल, असेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले. खासदार निंबाळकर आज माढा मतदारसंघात आले होते.
□ पंढरपूर येथे कृषी, कार्गो विमानतळ उभाण्यासाठी प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पंढरपूरवर विशेष लक्ष आहे. पंढरपूरच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल विमानतळ करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. द्राक्ष, डाळिंब, केळी आदी फळांची निर्यात होण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा पंढरपुरात सुरू करण्यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.