नागपूर : ‘केंद्रातील मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असून दुसरीकडे भारतीय जनता पार्टीत नितीन गडकरी यांचे खच्चीकरण सुरु आहे,’ असे सांगताना विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी मोठे विधान केले आहे. एके दिवशी नितीन गडकरी यांच्या घरावर धाडी पडतील, असेही वक्तव्य केलीय. One day, Nagpur Kanhaiya Kumar used CBI against Nitin Gadkari
केंद्रीय एजन्सींचा वापर देशाच्या सुरक्षेसाठी करण्याऐवजी केंद्र सरकार स्वतःची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर करत आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी एजन्सींचा वापर केला जात आहे. आम्हाला तर शंका आहे की एखाद्या दिवशी गडकरींच्या विरोधात ही सीबीआयचा वापर होऊ शकते’, असे वक्तव्य कन्हैय्या कुमारने केले आहे.
“युवा है जोश में लायेंगे इन्हे होश में” या घोषवाक्यासह काढण्यात आलेल्या रॅलीच्या माध्यमातून देशाला विकणाऱ्यांच्या विरोधात लोकांना जागे करण्याचे काम करणार असल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले. आज देशासमोर बेरोजगारी, महागाई हे आव्हान आहे, शासकीय कंपन्या विकल्या जात आहेत, हे सर्व थांबवायचं असेल, तर लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले. केंद्रीय नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. जे या देशाला विकत आहेत, त्यांना शुद्धीवर आणण्याची गरज आहे. ज्या लोकांना या देशाला वाचवायचं आहे ते लोकच देश विकणाऱ्यांना शुद्धीवर आणतील, असा इशारा त्याने केंद्र सरकारला दिलाय.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त नागपुरात काँग्रेस नेत्यांकडून आयोजित टेक्नॉलॉजी यात्रेत सहभागी झाल्यानंतर बोलताना कन्हैयाने हे विधान केले. कन्हैया कुमार काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. मला तर भिती आहे उद्या नितीन गडकरींवरही सीबीआयची धाड पडेल, असेही कन्हैया कुमार म्हणाले आहेत.
नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी ते आले होते. CBI चा गैरवापर भाजपकडून होतो आहे, असा आरोप कन्हैया यांचा आहे. गडकरी यांनी काहीदिवस आधी राजकारण सोडण्याची भाषा केली होती.
केंद्रीय एजन्सींचा वापर देशाच्या सुरक्षेसाठी करण्याऐवजी केंद्र सरकार स्वतःची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर करत आहे, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी एजन्सींचा वापर केला जात आहे, आम्हाला तर शंका आहे की एखाद्या दिवशी गडकरींच्या विरोधात ही सीबीआयचा वापर होऊ शकते असे सूचक वक्तव्य ही कन्हैय्या कुमार यांनी केले.