पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी शहरात अत्यंत लांच्छनास्पद घटना समोर आली आहे. लग्नामध्ये मानपान नीट झाला नाही म्हणून, सासूने त्याचा बदला लग्नानंतर सून आणि तिच्या होणाऱ्या बाळावर काढला. सुनेच्या पोटातील बाळ आपलं नात/नातू असेल याचे भानही न ठेवता तिने सुनेला डोकेदुखी गोळी म्हणून गर्भपाताची गोळी दिलीय. The climax of in-laws in Pune! Abortion pill given as a headache pill! Bhosari
ही घटना ११ नोव्हेंबर २०२० ते ५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत भोसरी येथे घडली. या प्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पाच जणांवर कौटुंबिक छळ तसेच अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे कमी की काय म्हणून जादूटोणाही केला. जादूटोणा करून गर्भपात करण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या जेवणात उदी टाकून तसेच बेडरुममध्ये ठिकठिकाणी मंतरलेले लिंबू व तत्सम वस्तू ठेवून फिर्यादीच्या मनात जीवाची भीती निर्माण केल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला. याप्रकरणी पीडित विवाहितेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. 18) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आमच्या मनासारखे लग्न झाले नाही, आमचा मानपान झाला नाही. अपेक्षेप्रमाणे दागिने दिले नाहीत. लग्न आवडले नाही, असे म्हणत विवाहितेचा छळ केला.
दरम्यान, विवाहिता गर्भवती असताना डोकेदुखीची गोळी म्हणून तिला गर्भपाताची गोळी दिली; तसेच गर्भपात करण्यासाठी जादूटोणा करून जेवणात अंगारा टाकला. बेडरूममध्ये ठिकठिकाणी मंतरलेले लिंबू व तत्सम वस्तू ठेऊन फिर्यादीच्या मनात भीती निर्माण केली. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत खासगी व्यक्तीकडून मोबाईलचे सीडीआर काढून त्यातील नंबरवर सासरच्या लोकांनी फोन केले.
दरम्यान, विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन दीराने तिचा विनयभंग केला. फिर्यादीवर संशय घेऊन खासगी व्यक्तीकडून मोबाईलच्या सीडीआर काढून त्यातील मोबाईल नंबरवर फोन करून फिर्यादीची बदनामी होईल, मनात लज्जा उत्पन्न होईल, असे आरोपी बोलले. फिर्यादीच्या दिराने फिर्यादीशी लगट करण्याचा प्रयत्न करून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटलंय . फिर्यादीला नांदवण्यासाठी माहेरच्यांकडून चार तोळे सोने हुंड्याची मागणी केली. हुंडा न दिल्याने आरोपींनी विवाहितेचा शिवीगाळ करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.