बुलढाणा : बुलढाणा येथे भाजप आमदार श्वेता महाले व भाजपा युवा मोर्चा यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी तिथे तुफान हाणामारी झाली. काही जणांच्या घोळक्याने एका गोविंदाला सलग तीन मिनिटे मारहाण केली. तिथे खूप गर्दी असल्यामुळे पोलिस वेळेत पोहचू शकले नाहीत. नंतर तिथे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळाने हंडी फोडून कार्यक्रम संपविण्यात आला. Stormy fights in Buldhana BJP MLA Shweta Mahal’s Dahi Handi
चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात काल (शुक्रवारी) जोरदार हाणामारी झाली. दहीहंडीच्या कार्यक्रमात मध्यरात्रीपर्यंत धुमशान सुरु होतं. या हाणामारीत काही गोविंदाही जखमी झाले आहेत. दहीहंडी आधी कुणी फोडायची यावरून दोन मंडळांत वाद सुरु झाला आणि तो इतका विकोपाला गेला की, मध्यरात्रीपर्यंत हाणामारी झाली. पोलिसांचा बंदोबस्तही अपुरा पडला. अखेर दहीहंडी न फोडताच कार्यक्रम संपला.
दहीहंडी कार्यक्रमात अनेक गोविंदा जखमी झाले. दहीहंडी फोडण्यासाठी आपला नंबर आधी आहे, या कारणावरून अनेक दहीहंडी मंडळात सुरुवातीला वाद झाला. काही वेळात तो निवळला. पण नंतर पुन्हा दोन मंडळात वाद होऊन तो इतका विकोपाला गेला की, या ठिकाणी अक्षरशः गोविंदांमध्ये तुफान हाणामारी झाली. हाणामारीपुढे पोलीस बंदोबस्त तोकडा पडल्यानं ही हाणामारी अक्षरशः एक तास सुरू होती. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर हा वाद शांत करण्यात आला. मात्र या घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला होता. अखेर घाईघाईत दहीहंडी फोडण्यात आली. हा कार्यक्रम संपविण्यात आला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यात एक गोविंदा जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. दहीहंडी फोडण्यासाठी याठिकाणी अनेक गोविंदा जमले होते. यावेळी कोण सर्वात आधी हंडी फोडणार? या कारणावरुन दोन मंडळांमध्ये हाणामारी झाली. मध्यरात्रीपर्यंत दहीहंडी कार्यक्रमात अक्षरशः युद्धभूमी सदृश परिस्थिती होती. देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर अनेक ठिकाणी यंदा उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली. मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी यंदा दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्धा भरवण्यात येतील अशी घोषणा केली. तसेच गोविंदाना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या निर्णयानंतर पुण्यात, मुंबईत स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावर विरोध दर्शविला.