श्रीपूर : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. महिला टी-20 चॅलेंजमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सोलापूरच्या किरण नवगिरेचा प्रथमच टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. किरण नवगिरेचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला. Solapur’s Kiran Navgire selected for Indian women’s cricket team
सोलापूर जिल्ह्यातील किरण प्रभू नवगिरेची भारतीय महिला क्रिकेट संघात ट्वेंटी-ट्वेंटी संघात इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालीय. सोलापूर जिल्ह्यातील मिरे, श्रीपूर अकलूजसह सोलापूर जिल्ह्यात किरण नवगिरे हिचे निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे. अनघा देशपांडे नंतर भारतीय संघात स्थान मिळवणारी किरण नवगीरे सोलापूरची दुसरी खेळाडू आहे.
प्रतिकूल परिस्थितीतून श्रीपूरच्या चंद्रशेखर विद्यालयात शिकत विविध क्रीडा स्पर्धा गाजवत पुढे पुणे विद्यापिठाच्या महिला क्रिकेट संघ, तसेच नागालँड, अरुणाचल प्रदेश कडून खेळत सराव, सातत्य यातून भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये झालेल्या ऑल इंडिया वुमन्स २० – २० क्रिकेट स्पर्धेत किरणने ८४ चेंडूत २०९ धावा काढल्या होत्या. त्यामध्ये १७ षटकार व २३ चौकारांचा तिने धावांचा पाऊसच पडला होता. त्यामुळे तिला गेल्या वर्षापासून नागालँड रणजी क्रिकेट संघामधून संधी मिळाली. किरण या सामन्यात लोसिटी संघाचा भाग होता. त्या सामन्यात तिनं 25 चेंडूत अर्धशतक झळकावल्यानंतर 34 चेंडूत 69 धावा केल्या होत्या. शिवाय किरणने वरिष्ठ महिला टी-20 ट्रॉफीमध्ये नागालँडसाठी 525 धावा केल्या. या स्पर्धेत ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. ती त्या संघाकडून उत्तम अशी कामगिरी करत आहे.
तसेच वरिष्ठ महिलांच्या २० – २० सामन्यात सर्वात वैयक्तिक धावांचा विक्रम नागालँडकडून खेळताना तिने अरुणाचल प्रदेश विरुद्ध केवळ ७६ चेंडूत १६२ धावा काढल्या होत्या. त्यामध्ये १५० हून अधिक धावा करणारी किरण नवगीरे ही भारताची पहिली खेळाडू ठरली होती. किरण नवगिरे हिने शालेय जीवनातही श्री चंद्रशेखर विद्यालयामध्ये भाला फेक, गोळा फेक, १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे या शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये मोठे यश मिळवले आहे.
किरणला दोन भाऊ आहेत. क्रिकेटपटू म्हणून करिअर करण्यापूर्वी ती सुरुवातीला ॲथलेटिक्समध्ये होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीच्या दिवसात तिने पहिल्यांदा क्रिकेट खेळले. तिने 2013-14 ते 2015-16 या हंगामात कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय विद्यापीठ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ती म्हणते की 2011 च्या विश्वचषकात धोनीने विजयी षटकार ठोकला तेव्हा देशासाठी आणि वैयक्तिकरित्या माझ्यासाठी खूप काही बदलले. यामुळे मी आज क्रिकेट खेळत आहे.
“मला मोठ्या स्पर्धा खेळण्याची संधी मिळत आहे. त्यामध्ये चांगली कामगिरी करून मिळालेल्या संधीचे सोने करायचे आहे. मला आई-वडिलांचे प्रशिक्षकांचे मोठे प्रोत्साहन मिळत आहे”
किरण नवगिरे – खेळाडू