नवी दिल्ली : दारु घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरुद्ध लुक आउट नोटीस जारी केली आहे. सीबीआयने ज्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे अशा आरोपींची नावे यात आहेत. ही लुकआउट नोटीस सिसोदिया यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण आता हे लोक देश सोडून जाऊ शकणार नाहीत. पण याला आता वेगळेच वळण आलं आहे. Deputy Chief Minister Manish Sisodian’s challenge to Narendra Modi, Delhi CBI also refused
सीबीआयने आज रविवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यात नाव असलेल्या १२ जणांविरुद्ध लुक आउट परिपत्रक जारी केले. मात्र या वृत्तास सीबीआयने दुजोरा दिला नाही.
दिल्ली सरकारने तयार केलेल्या नवीन दारू धोरणात अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शुक्रवारी सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. दरम्यान, लुक आऊट नोटीस पाठविल्याची वार्ता वाऱ्याचे वेगाने देशभर पसरली आणि त्याचे पडसादही राजकीय क्षितीजावर उमटू लागले. त्यानंतर सीबीआयने लुक आऊट नोटीस जारी केली नसल्याचे सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सकाळी लुक आऊट नोटीस जारी करण्याचे वृत्त येऊन धडकले. सिसोदिया यांच्यासह 15 जणांना देश सोडता येणार नसल्याची वार्ता वाऱ्याच्या वेगाने देशभरात पसरली. राजकीय वातावरण तापू लागले. त्यानंतर सीबीआयने अद्याप नोटीस जारी केली नसल्याचे सांगण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय एकतर सिसोदियांना लुक आऊट नोटीस जारी करेल किंवा हे प्रकरण ईडीकडे सुपूर्द करू शकते. ईडीकडे प्रकरण दिल्यास सिसोदियांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.
मनीष सिसोदिया य म्हटले की, तुमचे सर्व छापे फेल झाले, काही सापडले नाही, एका पैशाची हेराफेरी सापडली नाही. आता तुम्ही लूक आऊट नोटीस जारी केली आहे. तुम्ही म्हणत आहात की, मनीष सिसोदिया सापडले नाहीत. ही काय नौटंकी आहे मोदीजी. मी दिल्लीत सर्वांसमोर आहे. मी मुक्तपणे फिरत आहे, मला सांग कुठे येऊ असा सवाल करत पंतप्रधान मोदींना आव्हान दिले आहे.
दरम्यान, शनिवारी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये नाव असलेल्या पाच आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. शुक्रवारी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अधिकृत निवासस्थानावर छापा टाकला. याशिवाय दक्षिण दिल्लीतील दारू कंपन्यांच्या कार्यालयांवर आणि गोदामांवरही छापे टाकण्यात आले. तर आपचे राज्यसभा खासदार यांनीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे
उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले, आत्तापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही. दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण आरोग्याचे चांगले काम बंद पडावे म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवर खोटे आरोप असून न्यायालयात सत्य बाहेर येईल, असे म्हटले.